मन शुद्ध तुझं...(९-अंतिम)

आपत्तींमुळे खचून जाऊन कांही जण दारूच्या किंवा अंमली पदार्थाच्या नशेत स्वत:ला डुंबवून घेतात. म्हणतात, 'दु:ख विसरण्यासाठी आम्ही हे करतो! ’ वास्तवत: हा एक भ्रम आहे. अशा उपायातून तात्पुरता फरक होतही असेल, पण यातून मनाला निश्चित अशी शांती मिळणे केवळ अशक्य आहे. रोगापेक्षा हे औषध अधिक धोकादायक आहे. झोपेच्या गोळ्या? त्याही प्रश्नाचा गुंता सोडवू शकत नाहीत. मनाला शक्ती मिळण्याऐवजी ते अधिकच नाजूक, अशक्त, संवेदनक्षम बनत जाते. आत्महत्या? तो तर शुद्ध मूर्खपणा आहे. त्यातूनच पिशाचयोनी लाभते.

दादर येथे संस्कृत संभाषण वर्ग

बुधवार, दि. १५-४-२००९ ते शुक्रवार, दि. २४-४-२००९ पर्यंत जादुगार सौ. उज्ज्वला पवार यांच्या घरी ६, मंदार, द. स. बाबरेकर मार्ग, फुले कन्याशाळेसमोर, दादर, मुंबई - ४०००२८ येथे नि:शुल्क संस्कृत संभाषण वर्ग होईल.

वेळ - सकाळी ८. ३० ते १०. ०० पर्यंत.

अधिक माहितीसाठी संपर्क - श्री. प्रतीक रुमडे,
दूरध्वनी क्रमांक - २४३८४७२९.

वि. सू. : संस्कृत पूर्वज्ञानाची अपेक्षा नाही आणि वयोमर्यादा नाही.

मला भावलेलं एक आगळं – वेगळं प्रदर्शन

शाळेत शिकलेला इतिहास हा नेहमीच सनावळी व तहांच्या कलमांमध्ये अडकलेला असतो. पण, हाच इतिहास जर आपण आकर्षक रित्या लोकांसमोर आणला तर तो कसा रंजक होऊ शकतो याचा प्रत्यय मला नुकताच मी भेट दिलेल्या अमेरिकेतील एका प्रदर्शनातून आला.
चंगीस खान! हे नाव ऐकलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते बाराव्या शतकातील एका मंगोलीयन राजाचं क्रुर व्यक्तिमत्व! युरोप, आशिया पासून ते थेट जपान पर्यंत साम्राज्यविस्तार केलेला हा राजा त्याच्या राज्यातील जनतेसाठी क्रुर नव्हता हा भाग निराळा; पण, या प्रदर्शनातून खरोखरच चंगीस खान चे विविध पैलू अभ्यासायला मिळाले.

मन शुद्ध तुझं....८

अप्पलपोटेपणा अंगी शिरू देऊ नका.मन विशाल हवे. नि:स्वार्थीपणे, कोणत्याही अपेक्षेशिवाय दुसऱ्यास मदत करा. सेवा करा. निरपेक्ष मदत, नि:स्वार्थी सेवा खराखुरा आनंद देते; दुसऱ्यास आनंदी करते. त्यांच्या आनंदात आपण उजळून निघतो. जशी संधी प्राप्त होईल, छोट्या अगर मोठ्या प्रकारे दुसऱ्याची सेवा करीत राहा. कोणी कौतुकाचे चार शब्द बोलतील, कांही बक्षिस मिळेल, मान-सन्मान-मान्यता मिळेल, अशा प्रकारची कसलीही अपेक्षा मनात अजिबात बाळगू नका. वेगळी संधी मिळाली नाही तर जो कुणी दुसर सेवारत असेल, त्याच्या मदतीस पुढे व्हा. तन, मन, धन तिहींसह अथवा एकेकाद्वारे तुमचा सेवाभाव, सहभाग तत्परतेने व्यक्त करा.