टिचकीसरशी शब्दकोडे ४५

टिचकीसरशी शब्दकोडे ४५

शब्दकोडे
  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे  येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!

शोधसूत्रे :

आडवे शब्द उभे शब्द
साप टिंगलटवाळीस वेढतो आणि सागरी हल्ल्याला तोंड देतो. (५)
१३ सैनिकास मरण्यात  युद्ध दिसते! (३)
२१ चोपून काढ म्हणजे तिच्यावरून वाहने हाकता येतील. (३)
३२ ठाणे येण्यापूर्वी माहिती द्या. (३)
४३ बडतर्फी असो वा चित्रकला दोन्हीकडे हे आहेच. (३)
उलट्या गाण्यात महिना रमणारा  लोककलेतून उपजीविका करतो. (५)
माफ करत असता धारण करण्याची मर्यादा. (३)
तक्रारीचा सूर उमटण्यासाठी मतमतांतर दोन्हीकडून कृतीत आणणे. (५)
१२ ह्याला हाक मारताच दिसेनासे करायला सांगितल्यासारखे वाटते. (४)
१३ वेदनेसकट सगळे. (३)
३४ पदार्थ खायला देण्यास सांगण्याची आज्ञा झाल्यास आकारमान मोठे होते! (२)