जी-मेल मध्ये चित्र टाकणे

आतापर्यंत जी-मेल मध्ये चित्र  सहजपणे टाकता येत नव्हती. ही जी-मेलमधील एक मोठी कमतरता होती. मात्र आता गूगलने ही सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी 'सेटिंग्ज' मधील लॅब्ज ह्या टॅबवर टिचकी मारून 'इन्सर्टिंग इमेजेस' चालू करा. आता विरोपात तुम्ही स्वतःच्या संगणकावरील चित्र चढवू शकता किंवा जालावर उपलब्ध असलेल्या चित्राचा दुवा देऊ शकता. ते चित्र तुमच्या विरोपात दिसेल. अधिक माहिती इथे पाहा.

कोमल गंधार (भाग - अंतिम)

सकाळी कर्तव्य जाणीवेनंच ठरल्या वेळी प्रज्ञा उठली. खरं तर चैतन्यही आज तिच्याबरोबर जंगलात जाणार होता. पण आदल्या रात्रीच्या स्मरणधुंदीत स्वतःच्या झोपेला आवर घालणं त्याला अशक्य झालं. पटापट आवरून आणि बरोबर येणाऱ्या बाईला सोबत घेऊन प्रज्ञा तिच्या कामासाठी जंगलात निघून गेली. नऊच्या सुमारास आळोखे पिळोखे देत चैतन्य उठला. आंघोळ वगैरे उरकून त्याने पुन्हा आपलं लेखनाचं स्थान ग्रहण केलं.

राजकारण्यानो-जनाची नाहीच, मनाची तरी...

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाल्यानंतर सर्व प्रसारमाध्यमातून निवडणुकविषयक विविध बातम्या, वाद, आरोप-प्रत्यारोप व्हायला सुरुवात होते. यात एक महत्वाचा आणि नेहमी चर्चेत राहणारा विषय असतो तो निवडणुक लढवणाऱया उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेले आपल्या मालमत्तेबाबतचे प्रतिज्ञापत्र. आपण हे प्रतिज्ञापत्र शपथेवर सादर करत असल्याचे प्रत्येक उमेदवार ठासून सांगत असतो. काही अपवाद वगळता सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी सादर केलेली प्रतिज्ञापत्रे पाहिली किंवा त्या संबंधीच्या बातम्या वाचल्या तर या मंडळींच्या मालमत्तेची कशी कोटीच्या कोटी उड्डाणे होत आहेत, हे पाहायला मिळते.

पुस्तक परिचयः कालगणना

पुस्तक परिचयः कालगणना, लेखकः मोहन आपटे, राजहंस प्रकाशन,
आवृत्ती पहिलीः जुलै २००८, किंमतः रू. २००/- फक्त.

पंचांग आणि खगोलशास्त्र यांचा अतिशय घनिष्ट संबंध आहे. सूर्यनिर्मित ऋतुचक्र किंवा चंद्राचे कलाचक्र यांच्या संयोगानेच पंचांगांची रचना केली जाते. भारतीय पंचांगाचे नाते, आकाशाशी निरंतर जडलेले आहे. म्हणूनच त्यासारखे माहितीदायक पंचांग दुसरे नाही. विविध संस्कृतींनी निर्माण केलेल्या पंचांगांचा इतिहासही मनोरंजक आहे.

मतदारानो, माकडे होऊ नका

आगामी लोकसभा निवडणुका जवळ आल्या असून महाराष्ट्रात १३, २३ आणि ३० एप्रिल अशा तीन टप्प्यात मतदान होणार आहे. केंद्रातील सत्ताधारी आपली सत्ता टिकविण्यासाठी आणि विरोधी पक्ष सत्ता हस्तगत करण्यासाठी पुरेपुर प्रयत्न करत आहेत. आता पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा मतांचा जोगवा मागत पुढच्या पाच वर्षांची बेगमी करण्यासाठी सर्व राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते मतदारांना वेगवेगळी आमीषे दाखवत आहेत. मात्र सावधान, मतदारानो आपली ती तीन माकडे होऊ देऊ नका.