मराठी साहित्यात काही कविसंकेत रूढ आहेत. ते सर्व मुळ संस्कृतमधून आले आहेत. असे काही संकेत मी येथे काही देत आहे. हे संकेत म्हणजे समजूती आहेत. ते वैज्ञानिक सत्य असेलच असे नव्हे.
१. चकोर पक्षी केवळ चांदणे पिऊन जगतो, तर चातक फक्त पावसाचेच पाणी पितो.
२. गरूड जेव्हा नागाला पकडण्यासाठी झेप घेतो, तेव्हा नाग मंत्रमुग्ध होतो, काहीही हालचाल करीत नाही. या त्याच्या नजरबंदीस गारूड म्हणतात.
३. नागाला दूध आवडते. संगीत आवडते. तो पुंगी वाजवली की डोलतो. (वस्तुतः नागाला कान हा अवयवच नाही. )
४. हंस पक्षाला दूध आणि पाणी एकत्र दिले तर ते वेगवेगळे करता येते.