सोप्पे लाडू

वाढणी
१० लाडू

पाककृतीला लागणारा वेळ
15

जिन्नस

  • १ वाटी रवा
  • ३/४ वाटी साखर
  • १/४ वाटी तूप
  • थोडी विलायची

मार्गदर्शन

  1. रवा नीट भाजून घ्यावा.
  2. साखरेला मिक्सर मध्ये घालून पिठी साखर करावी.
  3. रवा थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक करून घ्यावा.
  4. रवा, पिठी साखर, विलायची आणि तूप एकत्र करावे.
  5. लाडू वळावेत.

टीपा

  1. रव्याच्या जागी बेसन, मुगाची डाळ भाजून त्याचे पीठ ही वापरू शकतो.

सावल्या

माथ्यावरचा सूर्य आता ढळला होता. संध्याछाया पसरू लागल्या होत्या. काळ्या मार्गावरून सावल्या सरकत होत्या.

सूर्यप्रकाशात अडथळा आणणे याखेरीज मानवी शरीराला काहीही महत्त्व नव्हते. त्यामुळे त्या सावल्यांवर मानवाचा, त्याच्या संतुलनाच्या अट्टाहासाचा, त्याच्या कोत्या विचारशक्तीचा काहीही अधिकार नव्हता. स्वतःच्या अज्ञात तत्त्वज्ञानाला अनुसरून त्या सावल्या पसरल्या होत्या.

ती सावली मानवी आकृतीसारखी भासत होती. पण डोके सोडल्यास बाकी सर्व भाग प्रमाणाबाहेर ताणले गेले होते. ती सावली एका विचित्र आकृतीवर आरूढ होऊन सरकत होती.