हासण्याचे दहा फायदे.

(' हसलात तर कळवा ' या माझ्या आगामी पुस्तकात 'पतीने पत्नीशी वाद कसा जिंकावा', 'कवी' याचबरोबर 'हसण्याचे विविध प्रकार' या विषयांवर लेख आहेत. त्यात नाजूक, विकट, छद्मी, सात्त्विक, खदाखदा, लाजून हासणे, निराश हासणे, वेड्यासारखे हासणे, हास्यक्लबचे हासणे, मुंबई-पुणे-नाशिक-जळगाव-औरंगाबाद-नगर-नागपूर-कोल्हापूर व कोकण येथील हासणे असे हासण्याचे विविध प्रकार व त्यांचे स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, हासण्याचे फायदे त्यात द्यायचे राहून गेले होते. ते येथे देत आहे. )

-----------------------------------------------------------------------------------------------------------

"हसा!"

ग्रँट रोड येथे सरलसंस्कृत संभाषणवर्ग ।

दि. १५-०४-२००९ ते दि. २५-०४-२००९ पर्यंत बालकवृंद शिक्षण संस्थेचे इंग्रजी विद्यालय, नवी चिखलवाडी, स्लेटर मार्ग, ग्रँट रोड, मुंबई - ४०० ००७ येथे नि:शुल्क संस्कृत संभाषण वर्ग होईल.

वेळ - सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत.

संपर्क - सौ. स्मिता माविनकुर्वे - दू. क्र. २३८१ ३१ ०५.

मनश्री

अरुण शेवतेंचं 'हाती ज्यांच्या शून्य होते' वाचलं तेव्हाच 'मनश्री'शी ओळख झाली आणि तिला अधिकाधिक जाणून घ्यायची इच्छाही..

कारण तिच्या हातात फक्त शून्यच नाही तर अंधारभरलं शून्य होतं पण त्या अंधारालाही उजळायला लावेल अशी तिची जिद्दकथा.. तिची, तिच्या आईची आणि साऱ्या कुटुंबाची! मनश्री जन्मली तिच मुळी डोळ्यात अंधार घेऊन, तिला जन्मत: बुब्बुळच नव्हती आणि त्यात भर म्हणून की काय फाटक्या ओठाची भर, मेंदूची वाढ, मणक्यांची क्षमता, मुकेबहिरेपणा.. अजून कायकाय तिच्यापुढे वाढून ठेवलं होतं ते समजलं नव्हतं.

जुन्या निवडणुकीतील गमती-जमती...

१९५२ मध्ये प्रथम संसदेच्या सार्वत्रिक निवडणूका झाल्या. त्यानंतर १९५७. १९५७ मध्ये मी जेमेतेम सात वर्षांचा होतो. मला आई बरोबर मतदानास गेलेले आठवते. त्यावेळी, मतपत्रिकेवर उमेदवरांची नावे नसत. एकच मतपत्र असे. विविध उमेदवारांसाठी वेगवेगळ्या मतपेट्या असत. त्यावर त्या त्या पक्षाच्या उमेदवाराचे निवडणूक चिन्ह रंगवलेले असे. आपले मतपत्र आपणास हव्या असणाऱ्या मतपेटीत टाकले जाई. कित्येक ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराखेरीजच्या मतपेट्या रिकाम्याच येत. एक वदंता अशी होती, की इतर पेट्यातील मतपत्रे काँग्रेसच्या मतपेटीत वर्ग केली जात. अर्थात हे केवळ काँग्रेसच्या बाबतच होत असेल असे नव्हे!

अद्वैत

सर्वत्र पुरातन नित्यनूतन मार्गांची कोळिष्टके पसरली होती. मधल्याच एका बंडखोर बिंदूवर ते दोघे उभे होते. भूतलाभोवती गोते खाणारा सूर्य सोडल्यास त्यांच्याकडे कालमापनाचे काहीच साधन नव्हते.

कुठल्यातरी अज्ञात हाताने इशारा केला आणि दोघांनीही चालायला सुरुवात केली.

सापेक्ष बलाची कल्पना यावी असे त्यांच्या शरीरयष्टीत काहीही नव्हते. लहान-मोठा, बलिष्ठ-दुर्बळ, अनुभवी-अननुभवी असली सालपटे त्यांनी दुर्लक्षित केलेली दिसत होती.

प्रत्येकाचा मार्ग निर्विकार निराळा होता, पण एकत्र येऊ नये असेही बंधन त्या मार्गांवर नव्हते.