"नावात काय आहे? " असं संत तुकाराम महाराजांनी म्हटलच आहे. आता काही नतद्र्ष्ट मंडळी हे वाक्य एखाद्या इंग्रजी लेखकाचं आहे, हे म्हणायला कमी करणार नाही. काही तर ठामपणे शेक्सपिअरचे नावही घेतिल. असो. नावात काय आहे, तुकाराम काय अन शेक्सपिअर काय. बाकी आम्हाला शेक्सपिअरशिवाय दुसरा कोणी ठाउक नाही ना
. तसही आजकाल परदेशी (म्हणजे अमेरिका बरं का) लोकांनी काही शोधून काढलं की आमच्या पुर्वजांनी ते आधीच शोधलं होतं, असं म्हणायची टुमच निघाली आहे.