स्मृतिगंध-१० "घर पाहावं बांधून.. "

माझे लग्न झाले त्यावेळी आम्ही विष्णुनगरात राहत होतो. एव्हाना प्रभाकराचेही लग्न झाले होते. विष्णुनगरातील जागा अपुरी पडू लागली होती. ती. गं भा वहिनीच्या बहिणीचे पोष्टाजवळ घर होते आणि ती मंडळी जळगावास राहत असत. त्यांचे घर रिकामेच होते म्हणून त्यांनी घराची दुरुस्ती करवून घेऊन आम्हांस तेथे राहण्यास सुचवले. बरेच दिवस रिकामे असल्यामुळे लोक त्या घराला भुताचे घर म्हणत पण आम्ही तिकडे लक्ष दिले नाही. त्यांचे घराची डागडुजी करून आम्ही तेथे राहायला गेलो. पुढे दोनेक वर्षे तेथे राहत असताना आम्हाला कोणताही विपरीत अनुभव आला नाही. आता घरात आम्ही तिघे भाऊ आणि सौ. अशी चारजणं कमावती झालो होतो.

स्वप्नील - भाग १

स्वप्नील हे नाव ऐकल्यावर कोणालाही एका सुसंकृत मृदू आणि सरळ मुलाची कल्पना डोळ्यासमोर येईल पण त्याच्या आगळ्या वेगळ्या जगाची आणि संघर्षाची कथा खूप वेगळी आहे त्याला सामान्य जीवनात परत आणण्यात माझी पण कसोटी लागली होती.

प्रवास...

दुःखातून लेखनाची निर्मिती होत असते, का?
शब्द, त्यातून उमटणारा सूर, त्याची तीव्रता, उदास भाव हे सारं
फोलपणातूनच वजनदार रूप धारण करतं.
मनाचा एखादा हळवा तंतू, उग्र रूप धारण करीत सगळे मनच काबीज करतो.
सुख, सुखाचा आनंद, समाधान हे सगळे तात्कालिक.
ते कधी सुरू झालं आणि कधी विरलं, सारच दिवास्वप्न.
दुःखाच्या डोहासारखे सुख कधी साठेल का?
स्वतःच्या पाऊलखुणांचे आभास ठेवून जाणार मनावर पसरलेलं धुकं जणू.
सुख गवसल्याचा जीवनांत असा फारच कमी कालखंड सापडेल,
तरीही त्या वितळत्या, तरल जाणीवेत माणूस गुंतलेला...
पण...

कुमठा नाका १

    शासकीय सेवेत प्रवेश करतानाच कधीतरी आपली बदली होणार याची जाणीव ठेवावी लागते. काही खात्यात बदल्या या तीन तीन वर्षाच्या अंतराने होतातच पण ती गोष्ट आमच्या तंत्रशिक्षण विभागास लागू होत नव्हती म्हणजे बदल्या त्यामानाने फारच कमी प्रमाणात होत. त्याचे मुख्य कारण म्हणजे  सगळ्याच तंतनिकेतन अथवा अभियांत्रिकी महाविद्यालयात अगदी कमी प्राध्यापकवर्ग असे आणि त्यात बदल्या केल्यास विद्यार्थ्यांना अनेक वेळा प्राध्यापकावाचूनच राहावे लागे आणि त्याचा परिणाम शैक्षणिक दर्जावर होत असे.

स्मृतिगंध-९ " शुभमंगल"

काही दिवसांनी अण्णाने वत्सुसाठी एक स्थळ आणले. गायवाडीतल्या मुळ्यांचा मुलगा लग्नाचा होता. मी पत्रिका घेऊन त्यांचेकडे गेलो. त्यांनी सर्व चौकशी केली. कोण? मूळचे कुठले? राहता कुठे? घरी कोण कोण असते? इ. इ. आणि २ दिवसांनी परत येण्यास सांगितले. मी परत २ दिवसांनी त्यांचेकडे गेलो. त्या दिवशी शनिवार होता. घरात मुलगा व वडील दोघेही होते. पत्रिका जमत असून मुलीस दाखवावयास केव्हा येता? असे त्यांनी विचारले. डोंबिवलीचा पत्ता मी देऊ लागलो असता त्यांनी गिरगावातच येण्यास सुचवले. अण्णाकडे मांगलवाडीतल्या घरी दुसऱ्या दिवशी पाहायचा कार्यक्रम ठरला.