भव्य हिमालय तुमचा अमुचा
केवळ माझा सह्यकडा
गौरीशंकर उभ्या जगाचे,
मनात पूजीन रायगडा
वसंत बापटांची ही कविता ऐकण्याच्या आधीच रायगडाच्या प्रेमात पडलो होतो. रायगडावर पहिल्यांदा कधी गेलो, ते आठवत नाही. (वय झालं आता! ) पण शाळेच्या सहलीतून गेलो नव्हतो, हे नक्की. दोनदा गेलोय, एवढं आठवतं. त्यालाही आता आठ-नऊ वर्षं झाली. लग्नाआधी तिरसटल्यासारखा एकटाच फिरायचो, तेव्हाची ही गोष्ट. 'सकाळ'मध्ये रुजू होण्याआधी 30 मे 1999 साली शिवरायांचा आशीर्वाद घ्यायला गेलो होतो, ते मात्र स्पष्ट आठवतंय!