आली दिवाळी... आणि गेलीसुद्धा - भाग २

परगांवाहून येणाऱ्या घरातल्याच आणि पाहुणे मंडळींच्या आगमनापासून आनंदोत्सवाची सुरुवात झालेली असली  आणि वसुबारस, धनतेरस वगैरे दिवस थोडेसे वॉर्म अप करून गेलेले असले  तरी दिवाळीची अधिकृत सुरुवात नरकचतुर्दशीपासून होते. या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुर नांवाच्या राक्षसाचा वध केला अशी कथा सांगतात, पण त्याचा आमच्या पहाटे उठून आंघोळ करण्याशी काय संबंध आहे हे कोडे मला लहानपणी पडायचे आणि त्याचे समर्पक उत्तर कधीच मिळाले नाही. देवदेवतांनी अवतार घेऊन अशा कित्येक असुरांचा नाश केल्याची उदाहरणे पुराणात आहेत, मग फक्त या नरकासुराच्या नांवाने आपण आंघोळ कशाला करायची?

रबडी

वाढणी
२ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ
60

जिन्नस

  • २ लिटर दूध(जास्त फॅट असलेले)
  • १ वाटीभर साखर
  • वेलचीपूड, केशराच्या काड्या, बदाम, पिस्त्यांचे काप, चारोळी

मार्गदर्शन

बटाटेवडे रोहिणी पध्दती

वाढणी
४ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ
60

जिन्नस

  • बटाटे ४
  • कांदा १
  • मिरच्या ६ तिखट, लसूण पाकळ्या ४ मोठ्या, कोथींबीर १ जुडी, अर्धे लिंबू
  • डाळीचे पीठ १ वाटी, ३ चमचे मैदा, वडे तळण्यासाठी तेल
  • मीठ , साखर चवीपुरते
  • हळद, हिंग

मार्गदर्शन

आली दिवाळी..... आणि गेली सुद्धा- भाग १

दिवाळीची सुरुवात होण्यापूर्वी मी हा लेख लिहायला सुरुवात केली होती, पण लिहिणे रेंगाळत गेले. त्यामुळे दिवाळी येऊन गेली सुद्धा. पण या लेखात लिहिलेल्या दिवाळीच्या आठवणी पन्नास वर्षाहून जुन्या आहेत. त्यामुळे आणखी दहा दिवस उशीराने फारसे बिघडणार नाही.

दरवर्षी दिवाळी आली की मी त्या वेळी शरीराने कोठेही असलो तरी मनाने थोडा वेळ तरी थेट बालपणाच्या काळात जाऊन पोचतो. त्याचे कारणही तसेच आहे. त्या काळात एकाद्या स्वप्नात असल्यासारखे भासणारे दिवाळीचे चार दिवस जीवनातल्या इतर सामान्य दिवसांपेक्षा फारच वेगळे असायचे.

कुठे बरं वाचलंय हे? - ७

या क्षणाला विमानातल्या या सीटवर असण्यापेक्षा इतरत्र कुठेही असणे त्याला आवडले असते. ती जादू करण्यासाठी कुठल्याही वेड्याला त्याने पाचशे रुपयेसुद्धा दिले असते. विमानातल्या त्या बंद कोंदट वातावरणात त्याचा जीव उबला होता. बाजूच्या वीतभर खिडकीच्या चरे पडलेल्या मळकट काचेतून एअरपोर्टचे दिवे अस्पष्ट दिसत होते. फूटभर अरुंद पॅसेजमधून शिष्ट वाटणाऱ्या एअर होस्टेसेस कंटाळलेल्या चेहऱ्याने पुढेमागे धावत होत्या. विमानात बघावं तिथे सीटस दिसत होत्या. त्यावर टेकलेल्या डोक्यांवर अलिप्त, बधिर मुखवटे होते. प्रत्येक माणूस दुसऱ्याला त्रासलेला होता. कुबट कोंदूस उबेला वैतागला होता.

गदर संस्थापकाची १२४ वी जयंती

आज गदर संघटनेचे संस्थापक डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांची १२४ वी जयंती - हे वर्ष या महान देशभक्ताचे शतकोत्तर जयंतीवर्ष!

कुठे बरं वाचलंय हे? -६

जंगलात नेहेमी शांत, प्रसन्न वाटतं. शरीरातल्या सगळ्या अशुद्धतेचा निचरा होतो.
व्रुत्ती सकारात्मक होते. विनयशीलता वाढते. शारीरिक क्षमता वाढते. उत्साही वाटतं.
मन चटकन एकाग्र होतं. शांत झोप लागते. सगळीकडे स्वच्छ असावं असं वाटू लागतं.
डोळे, कान, नाक या अवयवांची क्षमता वाढते.
चांगलं लिहावं, चांगल्या वळणदार अक्षरात लिहावं असं वाटतं.
आपण आपोआप चांगलं बोलायला लागतो.
फुलं-पानं तोडाविशी वाटत नाहीत. आपण समजूतदार, हळवे बनतो.
सगळं पहिल्यापासून नव्यानं जगावसं वाटतं.
उत्कट असा कोणताही निसर्गाविष्कार पाहिला की भरून येतं.