वाढणी
खाणार्यावर अवलंबून
पाककृतीला लागणारा वेळ
15
जिन्नस
- मेथ्या १ वाटी
- तिखट
- मीठ
- गुळ
- लिंबु
- फोडणीसाठी तेल
- हिंग
- मोहरी
- जीरे
मार्गदर्शन
मेथ्यांना मोड आणने (मटकीला आणतो त्याप्रमाणे). चांगले मोड आल्यावर, त्यात तिखट, मीठ, गुळ, लिंबू घालून मिसळून घेणे आणि वरतून खमंग फोडणी देणे. खमंग, पौष्टिक लोणचं तयार.
टीपा
हे लोणचं ७-८ दिवस फ्रिजमध्ये टिकतं. हिवाळ्यात अवश्य करून खावे.
माहितीचा स्रोत
आई