आतमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला, आणि शाळेचं कॅंटीन चालवणारा महाराज खांद्यावरच्या कळकट टॉवेलला हात पुसत धावतच हॉलच्या दरवाज्याशी आला.
हॉलमध्ये टाळ्या वाजतच होत्या, आणि स्टेजवर राणे सरांच्या पायावर डोकं ठेवून तो बराच वेळ तसाच बसला होता...
महाराजला हेच दृश्य अपेक्षित होतं.
काही वेळानं टाळ्या थांबल्या. खचाखच भरलेल्या हॉलमध्ये केवळ शांतता पसरली होती.
... आणि सगळ्यांचे डोळे पाण्यानं भरले होते.
राणे सरांच्या पायावर डोकं ठेवून त्यानं सरांची पावले हातांनी गच्च धरली होती, आणि तोही मुसमुसून रडत होता.
पण त्या रडण्याला दुःखाची जराशीदेखील छटा नव्हती.