ऊर्जेचे अंतरंग-११

ऊर्जेचे अंतरंग-११:

मोठ्या अवकाशानंतर आता ही मालिका पुन्हा सुरू करू या.

आपल्या दैनंदिन व्यक्तीगत शारीरिक गरजेकरता लागणारी ऊर्जा, घरगुती उपकरणांसाठी प्रतिदिन लागणारी ऊर्जा, आपल्याला दररोज उष्णता, उजेड, वारा, पाणी, वातानुकूलन, परिवहन इत्यादी गरजांसाठी लागणारी ऊर्जा लक्षात घेतली आणि ती आपण मिळवतो कशी ह्याचा ताळेबंद लक्षात घेतला तर आपण तिच्या निरंतर उपलब्धतेसाठीचे नियोजन व्यवस्थित करू शकू. प्रथमतः आपल्या दैनंदिन व्यक्तिगत शारीरिक गरजांचा ताळेबंद पाहू.

पातंजल योगसूत्र व भाष्ये: १२

पातंजल योगसूत्र व भाष्ये: १२

मनोगती नामी_विलास ह्यांनी योगसूत्रांच्या ह्या स्वाध्यायास शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत. त्यांनी संदर्भासाठी आणखीही एक पुस्तक सुचवलेले आहे.

३. "पातंजल योगप्रदीप", डॉ.पु.पां. जाखलेकर, अनमोल प्रकाशन, पुणे, प्रथमावृत्ती: २००१, किंमत: रू.१००/- फक्त, पृष्ठे १४५.

मुद्राराक्षसाचा फसवण्याचा धंदा! (अं हं - हसवण्याचा)

पूर्वी काही मासिकांमध्ये "मुद्राराक्षसाचा विनोद" असा एक विभाग असायचा. त्यात काही वाक्ये असायची आणि त्या वाक्यांमध्ये एक किंवा दोन शब्द हे मुद्दाम काना किंवा मात्रा बदलून किंवा वेगळा शब्द टाकून लिहायचे. त्यामुळे वाक्याचा अर्थ असा काही बदलायचा की हसता हसता पुरेवाट व्हायची. तशी काही वाक्ये मला सुचत आहेत. आपणा सर्वांना सुचत असतील तर आपणही सुचवू शकता.

प्रचंड क्षमतेचं शहर नागपूर

कोणत्याही ठिकाणच्या वनसंपदेच्या श्रीमंतीवर तिथल्या वन्यजीवांचं प्रमाण अवलंबून असतं. वनसंपदा जितकी जास्त तेवढ्या विविध जाती-प्रजातींचे पक्षी, प्राणी त्या भागात जास्त प्रमाणात आढळतात. निसर्गाने नागपूरला भरभरून सृष्टीवैभव दिलं आहे. प्रचंड वनसंपदा आणि वन्यजीवन असलेलं 'पेंच' आंतरराष्ट्रीय तोडीचं नॅशनल पार्क आहे.

प्राचीन भारतीय खगोलशास्त्र ८

महाभारतापासून (१० सप्टेंबर ई.पू.३००८ ग्रेगरीयन) दिवस मोजल्यास कोणतेही सूर्यग्रहण(किंवा चंद्रग्रहण )सिद्ध करता येते.उदा. महाभारतापासून १ ऑगस्ट ई‌. स. २००८ पर्यंत१८३२०१६ दिवस किंवा ६२०३८ चांद्रमास किंवा ५२८५.४७ ग्रहणवर्षे झाली आहेत.पण २४ नोव्हेंबर ई‌. स.२००३ चे सूर्यग्रहण जास्त वैशिष्ट्यपूर्ण होते कारण या दिवशी पण  कार्तिक अमावस्येस व अनुराधा नक्षत्रातच सूर्यग्रहण होते.

पातंजल योगसूत्रे व भाष्ये: १६

पातंजल योगसूत्रे व भाष्ये: १६

समाधिननेन समस्तवासना
ग्रन्थेर्विनाशोऽखिलकर्मनाशः |
अन्तर्बहि: सर्वत एव सर्वदा
स्वरूपविस्फूर्तिरयत्नतः स्यात् || विवेक चूडामणि ३६४

या निर्विकल्प समाधीच्या योगाने, अंतःकरणांतील सर्व वासनारूप ग्रंथींचा नाश होतो आणि त्यापासून निर्माण होणार्‍या कर्माचा पूर्ण क्षय होतो. असे झाले म्हणजे, आत आणि बाहेर, दोन्ही प्रसंगी स्व-स्वरूपाचे स्फुरण सर्वदा प्रयत्न केल्यावाचून सहजपणे होऊ लागते.

पातंजल योगसूत्रे व भाष्ये: ११

पातंजल योगसूत्रे व भाष्ये: ११

अनंतशक्तिरैश्वर्यं निष्यन्दाश्चाणिमादय: ।
स्वस्येश्वरत्वे संसिद्धे सिध्यन्ति स्वयमेव हि ॥
पुष्पमानया गन्धो विनेच्छामनुभूतये ।
पूर्णाहम्भावयुक्तेन परिच्छिन्ना विभूतय ॥ - मानसोल्लास:

कोल्हापूरच्या कुळकर्ण्यांच्या कमलचे काका : २

’कोल्हापूरच्या कुळकर्ण्यांच्या कमलचे काका ...’ हा विरंगुळा अनेकांना आवडला. म्हणून हा त्याचा दुसरा भाग.

( पुन्हा एकदा, यांत वापरलेली नावे पूर्णपणे काल्पनिक आहेत. प्रत्यक्षात साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. हा केवळ एक विरंगुळा आहे. कुणालाही दुखवायचा यात हेतू नाही.)

एक होत राजा...

पूर्वी गोष्टीची सुरवात अशी होत असेः एक होता राजा. त्याला दोन राण्या होत्या.एक आवडती होती व दुसरी नावडती होती.....इत्यादि.....

आता राजा म्हटल्यावर काय कमी असणार? पण प्रेम मात्र त्याला समान वाटून देता येत नसावे.आता लोकशाही म्हटली तरी थोडीफार तशीच परिस्थिती आहे.कोणताही पक्ष म्हटला तरी वरपासून गल्लीपर्यंत एक हितसंबधियांची साखळी तयार होते.त्यात जाउन बसतात ते आवडते होतात. जे तत्त्वाने वागण्याचा प्रयत्न करतात ते बाजूला पडून नावडते होतात.आवडत्यांमध्ये एवढी मजबूत संपर्क प्रणाली निर्माण होते की ते जळी ,काष्ठी,पाषाणी एकसारखे मोबाईलवरून फोन करून एकमेकांना काहीतरी सांगत असतात.नावडत्यांना काय चालले आहे ते कळत नाही.एकादा माहीती अधिकारांतर्गत अर्ज दिल्यास १ महिन्याच्या शेवटी जुजबी व बचावात्मक माहिती मिळते.नावडत्यांना सर्व सरकारी/निमसरकारी खाती अभेद्य वाटतात.आवडते मात्र नारदाप्रमाणे सगळीकडे मुक्त संचार करीत असतात व ताबडतोब काही माहितींची देवाण घेवाण करीत फिरत असतात.त्याना कोठे जावयाचे व काय करायचे याचा जणू साक्षात्कार होत असतो.नावडता एकटाच असतो.आवडत्यांच्या मात्र झूंडी फिरत असतात.अण्णा हजारे यानी माहिती अधिकार कायदा करवून घेतला.पण नोकरशाही तशीच राहणार आहे.