प्राचीन भारतीय खगोलशास्त्र ३

युगांची वर्षे खालील प्रमाणे :

कृतयुग :  ४०० + ४००० +४००

त्रेतायुग : ३०० +३००० +३००

द्वापारयुग : २०० +२००० +२००

कलियुग : १०० +१००० +१००

प्रत्येक युगाच्या सुरवातीस व शेवटी संधिकाळाची वर्षे आहेत.

यापैकी कलियुगची वर्षे  इ.पू.१९०० च्या सुमारास ३६० ने गुणून ४,३२,००० केली असल्यामुळे कलियुग इ.पू.३१०१ मधे सुरू होउनही अजून संपले नाही.कलियुगात सर्व मानव आहेत (देव नाहीत)असे समजून हा बदल करण्यात आला.

मांजर व्हा!!!!

काय म्हणताय? आयुष्याचा कंटाळा आलाय? रोजचं ऑफीस, बॉस आणि बायकोची कटकट याने वैतागलाय? वैतागू नका. माझ्याकडे उपाय आहे. मांजर व्हा!!!! चेष्टा नाही! खरच!  माझा अनुभव सांगतो...

मी पण असाच वैतागलो होतो. हिमालयात निघून जावसं वाटायच. मनात यायचं उगाच माणसाच्या जन्माला आलो. प्राणी असतो तर फक्त पोटाची काळजी असती. बाकीच्या काळज्या नसत्या.

पातंजल योगसूत्रे व भाष्ये: ६

पातंजल योगसूत्रे व भाष्ये: ६

मायबोली डॉट कॉम च्या २००६ च्या अंकात आशिष महाबळ ह्यांनी लिहीलेल्या खालील लेखात योगाभ्यासाच्या पार्श्वभूमी विषयी चर्चा केलेली आहे. लेख वाचण्यासारखा आहे.

भारतीय तत्वचिंतनाचा वेध : वेद ते वेड?

उघड कुंजी कूटांकन

कूटांकन, विषेशतः (उघड कुंजी वापरून) म्हणजे काय प्रकार आहे आणि ह्या तंत्रज्ञानाचा वापर केल्याने आंतरजालावर तुमच्या वैयक्तीक किंवा इतर महत्वाच्या माहितीची बुरुजगळ न होता सुरक्षितपणे कसे व्यवहार करता येतात हे मी एकदा माझ्या मामाला समजावून सांगायचा प्रयत्न करत होतो.  ही माहिती मनोगतींनाही उपयुक्त वाटेल असे वाटल्याने मी ती सोप्या शब्दात येथे देण्याचा प्रयत्न करीत आहे.

विष्णुपन्त कुलकर्णी (भाग २)

पंतांच्या मुखातून शब्दाऐवजी निखारे बाहेर पडले आणि मुराच्या अंत:करणात धैर्याचा महासागर लाटा उधळीत उठला. त्याने चटकन वाकून पंतांपुढे हात टेकला आणि उठून गंभीरपणे तो म्हणाला, "आबा, मी जातो."

"जा, उकिरड्याचा पांग फिटतो आणि तुम्ही तर माणसे आहात." पंतांनी मुराला निरोप दिला.

प्राचीन भारतीय खगोलशास्त्र भाग २

पूर्वी चांद्रमास लहान होता.आता वाढला आहे.

चार युगांची सुरवात शास्त्रीय आहे.

कृतयुग ४ एप्रिल १३९०१इ.पू. ,कार्तिक शु.९ रोजी सूर्य १९७ अन्शावर  वसंतसंपातबिंदूवर

असताना सुरू झाले.(त्यापूर्वी ३० सप्टेंबर १३९०२ इ.पू.,वैशाख शु.३ रोजी सूर्य १७ अन्शावर

संख्या संकेत कोश २

श्री. शा. हणमंते यांच्या कोशातले आणखी काही संख्या संकेत--

द्वादश देवासुर संग्राम--प्राचीन काळी देव आणि असुर यांच्यात झालेले संग्राम द्वादश संग्राम म्हणून पुराणात वर्णिले आहेत. १)नारसिंहसंग्राम --नरसिंह व हिरण्याक्ष २)वामनसंग्राम --वामन व बली ३)वाराहसंग्राम --वराह व हिरण्याक्ष ४)अमृतमंथन --देव व दानव ५)  तारकामयसंग्राम --तारकासुर व कार्तिकेय ६)आडिबक युद्ध--वसिष्ठ व विश्वामित्र यांच्यात आडी व बक या पक्षीरुपाने झालेला संग्राम ७)त्रैपुरसंग्राम --मयनिर्मित तीन पुरांचा शिवाकडून विध्वंस ८)अंधकवधसंग्राम ९)ध्वजसंग्राम--विप्रचिती व इंद्र १०)वृत्रघात --वृत्रासुर व इंद्र ११ व १२) हालाहल व कोलाहलसंग्राम --सर्व दैत्यवर्ग व आयुपुत्र रजी. 
बारा नारद--१)मुनिनारद२) ज्ञानीनारद ३) तपीनारद ४) योगीनारद ५)ऋषीनारद          ६)वागीशनारद ७)खेचरनारद ८)कलिनारद ९)देवर्षिनारद १०)भूगामीनारद ११)कालज्ञनारद व १२)मित्रनारद असे बारा नारद नावाचे मुनी प्राचीनकाळी होऊन गेले. 

विष्णुपन्त कुलकर्णी (भाग १)

- अण्णा भाऊ साठे

कडूसं पडून तोंडओळख मोडली होती. अंधाराच्या लाटा गावाच्या डोकीवर नाचत होत्या. कभिन्न काळोखाने विष्णुपन्तांच्या वाड्याची उंची भुईसपाट केली होती. लूत भरलेल्या कुत्र्याप्रमाणे ओसाड वातावरण कण्हत होते. चोहोकडे नि:शब्दता नांदत होती.

आग लागो, `तसल्या' नजरेला!

तसल्या नजरेनं तुला कधी पाहिलंच नाही रे (राजा!)
ज्या वाक्‍यांची अस्मादिकांना सर्वाधिक तिडीक आहे, (आणि तरीही "कोवळ्या' वयात जे किमान दहा-बारा वेळा तरी ऐकावं लागतं,) अशापैकी एक वाक्‍य.

परवा "असंभव'मधला एक लाडिक, मधाळ सीन पाहताना हे वाक्‍य डोळ्यासमोर नाचत होतं. नको-नको म्हणत असताना मन पुन्हा कॉलेजच्या दिवसांत गेलं.

प्राचीन भारतीय खगोलशास्त्र

प्राचीन भारतीय खगोलशास्त्र १६००० वर्षाएवढे जुने आहे.परंतू  ३ मुख्य कारणामुळे

प्राचीन काळातील तारखा ठरविताना अडचणी येतात.

१) चन्द्र हळूहळू दूर जात आहे.त्यामुळे चांद्रमास कमी होत आहे.आता जरी २९.५३०५८८८५

दिवस असला तरी महाभारतकाळी २९.५३०५२४४९ होता.