"नकार" किती नकारात्मक शब्द आहे आणि तेवढाच भयानक एखाद्याचे आयुष्य उध्वस्त करून सोडतो तर एखाद्याला आयुष्य जगायचे कसे ते दाखवून देतो. साहजिक चं आहे माझ्या ही बाबतीत असेच काही तरी घडले म्हणूनच तर लिहितो आहे.
प्रेमाच्या सुंदर स्वप्नांतून जागा होतो नाही तोच आयुष्याने त्याचे रंग दाखवायला सुरवात केली. ज्या स्वप्नावर आता पर्यंत जगत होतो ते डोळ्या समोरून धूसर होत चालले होते, मनात नुसती चिडचिड होत होती. काही करून पण ती थांबायला तयार होईल असे वाटत नव्हते. उलट काही केले तर अजून बिघडून परिस्थिती हाता बाहेर जाऊ शकत होती. कारण माजे सगळे बोलणे हे तिला माजे स्पष्टीकरण चं वाटत होते, आणि माला नेमके याच वेळी काही शब्द फुटत नव्हते. माझ्या डोळ्या समोर मात्र तोच दिवस दिसत होता...
मी नवीन कॉलेज मध्ये नुकताच रुळू लागलो होतो, तोच एके सकाळी कूलर जवळ पाणी पीत असताना बाजूला काही तरी हालचाल जाणवली म्हणून बघितले, सडपातळ, मध्यम उंची सावळसर पण उजळ रंगाची एक मुलगी भरभर चालत वर्गात चाललेली, माझ्या कडे बघून जरा तिला धीर आलेला पण तरी न थांबता सरळ वर्गात घुसली, माला ही त्याच वर्गात जायचे होते पण मी उगाच टगळ मंगळ करत राहिलो आणि तिचे वर्गात गेल्या नंतर थोड्याच वेळात मी: "मे आई कम इन" करत वर्गात एंट्री मारली, तर पहिली नजर त्याच मुलीवर थांबली आणि ती ही मलाच पाहत होती एका आश्चर्यचकित नजरेने ! मी मनातल्या मनात इतका सुखा ऊन गेलो होतो की पूर्ण लेक्चर काय होत हे तर माला आजही आठवत नव्हते. आठवत होते ते फक्त तिचे ते निरागस रूप, तिने मला पाहणे आणि मी तिला, क्षण भर मी कुठल्या दुनियेत हरवलो कुणास ठाऊक. लेक्चर संपले आणि मी भानावर आलो, आणि नजर वळली ती थेट तिच्या कडेच. आणि मला प्रत्यय आला की ती ही त्याच नजरेने माझ्या कडे बघत आहे एका परिचित नजरेने. सगळे हळू हळू वर्गांतून निघायला लागले आणि मी एका वेगळ्याच आंतरिक ओढी ने तिच्या कडे चलला गेलो. तिला याची जाणीव होताच थोडे सांभाळून ती तिच्या मैत्रिणींच्या ग्रुप मधून मागेच राहिली. आणि मी तिच्या जवळ पोहोचलो. तोंडातून शब्द निघाले "हाऽऽऽय" ते ही दोघांच्या ही एकावेळीच. मी आजही अजून पण इतका हळहळ तो की, त्या एका शब्दावर माझ्या मनामध्ये खोलवर कुठे तरी असे काही तरी हळू लगते आणि वाटते जणू समुद्रा च्या त्या खळखळत्या लाटा माझ्या मनाच्या किनाऱ्यावर येऊन विरून जात आहेत.
तो दोन लेक्चर मधला वेळ, वर्गाबाहेर खूप वर्दळ, कोणी तरी ओरडले "नेक्स्ट लेक्चर ऑऽफ" आता वर्ग पूर्ण खाली पण मनात मात्र खूप प्रश्न तेच बाहेर पडत होते, नाव, गाव, कुठे राहते इत्यादी इत्यादी, मग त्या वर प्रतिक्रिया आणि त्यावर पुन्हा प्रतिक्रिया अश्या गप्पा चालूच एक-मेकां न बद्दल जाणून घ्यायला दोघे ही उत्सुक, पुन्हा कोणी तरी ओरडले प्लीज कीप रूम व्हेकंट. देअर इज अनदर लेक्चर इन धिस रूम. मग आमची स्वारी बाहेर निघाली कुणी इकडे कुणी तिकडे सगळे विखुरले गेले, नवीनं ओळख झालेले माझ्या कडे वेगळ्याच नजरेने पाहू लागले, आणि मला थोडे ओशाळल्या सारखे वाटू लागले पण आम्हाला मात्र किती बोलू आणि किती नको असे जाले होते. नकळतच आम्ही पायऱ्या उतरून खाली आलो आणि कट्ट्यावर बसून उरलेल्या गप्पा पूर्ण करू लागलो. गप्पा संपताच नव्हत्या आणि माजे तिला आणि तिने मला न्याहाळणे देखील
का कुणास ठाऊक अनोळख्या जागी कोणी तरी ओळखीचे भेटले याचा आनंद होत होता की जणू ही ओळख खूप दिवसां पासून ची असल्याची जाणीव होत होती. त्या नंतर मला असे सुखद धक्के मिळतच गेले आणि मी आणि ती जेवढे सुखावत गेलो तेवढेच जवळ ही येत गेलो. या नंतरचे सर्व काही एका स्वप्ना प्रमाणे घडत गेले आणि त्या सुंदर क्षणां मध्ये मी इतका हरवून गेलो की मी माझाच न राहिलो अन मैत्रीच्या त्या नात्यामध्ये विरून गेलो. दोघांनी मिळून कुठली गोष्ट सोडली नव्हती की जी वाटून घेतली नसेल. लेक्चर नोट्स, पासून ते घरून आलेल्या खाऊच्या डब्या पर्यंत, लहानपणा पासून ते अगदी आतापर्यंत सर्व घटना आणि सर्व गोष्टी दोघांच्या एकमेकांना इतक्या पाठ झाल्या होत्या की विषय निघायची सुरवात पुढील सर्व संवाद आपोआप पूर्ण होत असे. माझ्या मना सारखी मैत्रीण मिळाल्यामुळे मी इतका आनंदी होतो की या हून ही जास्त आनंद जर कुठे असतो असे मला जर कोणी सांगितले असते तर मी त्याला वेड्यात काढले असते. त्या मुले या पुढे जायचा मी कधी विचारच केला नाही. कारण... अगदी गौरव जोशींच्या कविते सारखे मला ही वाटू लागले होते "मला वाटायचे तिचे माझ्यावर जिवापाड प्रेम आहे, फक्त विचारायची देरी आहे..."