लोकल गोष्टी
- लोकल प्रवास
- १. फर्जाना यादव
- ३. नटवर
- २. हातातला खजिना
- ४. माझ्या समोर बसलेली ती;
- ५. आईचा मुलगा हरवला..
- ६. गर्दीतले चेहरे..
- ७. ओळख; पहीली आणि शेवटची.
- ८. मैत्री एक्सप्रेस
- ९. दहशत
- १०. मेलडी
- ११. भिकारी पोट्टा
- १२. लेडीज कंपार्टमेंट आणि पुरुष प्रवासी
- १३. मरणघाई
- १४. नव्या जगात प्रवेश
- १५. बोलपाखरं
- १६. हादरे)
- १७. काही नमुने..
- १८. नावड
- १९. शहाण्या आणि वेड्यांच्यातलं अंतर
- २०. हाता तोंडाची गाठ
- २१. अंधाऱ्या बोळाच्या टोकावर
- २२. पहिली खेप
- २३. संकेत पौर्णिमेचा
- २४. "गॉड ब्लेस यू..! "
- २५. तिखा चटणी मिठा चटणी
- २६. असाही दहशदवाद
- २७. वेगळा-वेगळा
- अच्छा तो हम चलते है..! ( लोकल गोष्टी-२८)
आज सकाळी ऑफिसला जाताना चर्चगेटला जाणारी नऊ डबा लोकल येत असल्याची अनाउँसमेंट झाली.. तसं आपल्या मौसम खात्या अंदाजां प्रमाणेच कधीही बरोबर नसणाऱ्या लोकल्सच्या या अनाउँसमेंटवर कोणी विसंबून राहत नाही. ( ते निदान अंदाज तरी असतात. ) समोरून येणारी लोकल दिसली की प्लॅटफॉर्मच्या कडेला जाऊन वाकून वाकून ती बारा डब्बा आहे की नऊ डब्बा आहे याची खात्री बायकांना तरी करूनच घ्यावी लागते, पण हल्ली या बदललेल्या नव्या लोकलवर पूर्वी सारखा मोठ्ठा दूरूनही दिसू शकेल असा ठळक बोर्ड नसून बारीक आकडे दाखवणारा इलेक्ट्रिकल इंडिकेटर असल्यामुळे गाडी नऊ डब्बा आहे की बारा डबा आहे ते मधला अपंगांचा डब्बा दिसेपर्यंत कळतच नाही. आणि मग त्या नंतर पळून लेडीज डब्यापर्यंत जाण शक्यच नसतं. त्यामुळे मग बायका एक तर अपंगांसाठी राखीव असलेल्या डब्यात घुसतात किंवा त्याच्या शेजारच्या जनरल सेकंड क्लासच्या डब्यात चढतात. ( आणि मग तो डब्बा लेडीज डबा वाटायला लागतो. )
आजही काही बायकांनी या तर काही बायकांनी त्या डब्याचा पर्याय निवडला. लोकल सुरू झाली.. आणि पुढच्याच स्टेशनवर टीसी महाशय डब्यात चढले. डब्यात चढलेल्या सगळ्या बायका दाराशीच उभ्या होत्या. निम्म्याहून अधिक जणींकडे फर्स्टक्लासचा पास होता. टिसीला पास दाखवता दाखवता मला कॉलेजच्या दिवसांमधला असाच एक मजेदार दिवस आठवला.
कॉलेज सुरू होवून एक-दोन महीने झाले असतील नसतील तेव्हाची गोष्ट. आमच्या बॅचच्या एका मुलीचा पास संपला होता ( बहुतेक उशीरा लक्षात आले असवे. ) म्हणून तिने सेकंडक्लासचे तिकीट काढले होते. लोकल येईपर्यंत सगळे एकाच ठिकाणी गप्पा मारत थांबले होते. लोकल येताना दिसली तशी रीना सगळ्यांना बाय करून सेकंडक्लासकडे जायला निघाली.. तिच्या सोबत म्हणून आणखीन एक-दोन जणीही निघाल्या.. तेवढ्यात आमच्यातल्या एका हिरोने संधी साधून परिस्थिती ताब्यात घेतली.. आणि मुलं मुली मिळून आम्ही जवळ जवळ पंचवीस तीस जण सेकंडक्लासच्या जनरल डब्यात स्थानापन्न झालो.
तेव्हाही असाच एक टीसी तिकीट तपासण्यासाठी आला होता आणि एक रीना सोडली तर आम्हा सगळ्यांकडेच फर्स्टक्लासचा पास होता. एक-दोन-तीन-पाच-पंधरा बघेल त्याच्याकडे फर्स्टक्लासचा पास. आम्ही सगळे फिदी-फिदी हसत पास दाखवत होतो आणि एकेकाने दाखवलेला फर्स्टक्लासचा पास बघून तो टीसी गॉड ब्लेस यू गॉड ब्लेस यू म्हणत पुढचा पास हातात घेत होता. ( त्यालाही पास तपासताना आमच्या इतकीच मज्जा येत होती. ) पुढे कितीतरी दिवस गॉड ब्लेस यू हे पालुपद आम्हा सगळ्यांच्या ओठावर होतं. रीनाला तर शब्दा शब्दाला गॉड ब्लेस यू म्हणून सगळ्यांनी हैराण करून सोडलं होतं.
पुढे आपल्याशी मिळत्या जु्ळत्या मित्र मैत्रिणी शोधत सगळीकडे पडतात तसेच एकसारख्या विचारांच्या एकसारख्या बॅग्राऊँड मधून आलेले एकसारख्या आवडी निवडी असलेले काही जण जास्त निकट येत गेले.. आणि मग दोन, चार, पाच, दहा, पंधरा.. ग्रुप होत गेले. आणि कळत गेलं त्या टीसीच ते त्या वेळचं "गॉड ब्लेस यू" आमच्या फर्स्टक्लासच्या पाससाठी नसून आमच्या तेव्हाच्या एकत्र असण्याला होतं.
==================
स्वाती फडणीस........... १८०३१०