कुठे बरं वाचलंय हे? -६

जंगलात नेहेमी शांत, प्रसन्न वाटतं. शरीरातल्या सगळ्या अशुद्धतेचा निचरा होतो.
व्रुत्ती सकारात्मक होते. विनयशीलता वाढते. शारीरिक क्षमता वाढते. उत्साही वाटतं.
मन चटकन एकाग्र होतं. शांत झोप लागते. सगळीकडे स्वच्छ असावं असं वाटू लागतं.
डोळे, कान, नाक या अवयवांची क्षमता वाढते.
चांगलं लिहावं, चांगल्या वळणदार अक्षरात लिहावं असं वाटतं.
आपण आपोआप चांगलं बोलायला लागतो.
फुलं-पानं तोडाविशी वाटत नाहीत. आपण समजूतदार, हळवे बनतो.
सगळं पहिल्यापासून नव्यानं जगावसं वाटतं.
उत्कट असा कोणताही निसर्गाविष्कार पाहिला की भरून येतं.

पुस्तकाचे नाव आणि लेखक ओळखीचे वाटतायत न? सांगा  पाहू.