किती प्रेम माझे तुजवर - कळेना मला ते

पुरुषस्वरातील गाणे -

किती प्रेम माझे तुजवर - कळेना मला ते
मला परि न जगता येते - तुझ्यावाचुनी ।ध्रु।

म्हणे यातना विरहाच्या - जगी साहती
न ओझे कळे जीवनभर - कसे वाहती
इथे दिवसही मज वाटे - वर्षासमान
प्रतीक्षा असे मज कुठवर -
कळेना मला ते
मला परि न जगता येते - तुझ्यावाचुनी
।१।

दुजे कोणि तुज पाही तर - मना जाळते
तरी केवढ्या कष्टाने - सांभाळते
किती मी प्रयास करतसे - तुला काय जाण
हृदय हे किती अनावर -
कळेना मला ते
मला परि न जगता येते - तुझ्यावाचुनी
।२।

स्त्रीस्वरातील गाणे -

किती प्रेम माझे तुजवर -कळेना मला ते
मला परि न जगता येते - तुझ्यावाचुनी ।ध्रु।

रात्रंदिन तुजवर मन खिळले
प्रेम जुने तव स्मृतितून ढळले
मोल न कळले - मोल न कळले ।१।
किती प्रेम माझे तुजवर ...

तुज कोणी जर रोखुन पाही
मजला होत सहन ते नाही
मन मम दाही - मन मम दाही ।२।
किती प्रेम माझे तुजवर ...

चाल : मूळ गाण्याचीच!   (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल  )

विनंती :
१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.

२. फक्त गाणे ओळखू नका.  (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )

३. ध्रुवपदाचे भाषांतर सुचल्यास तेही कळवा