नायक : | पाडून वीज जासी - अन् वीजभय तुला साधेपणावर तुझ्या - मी जीव टाकला |
नायक : मन वेडे - तुझ्यासाठी गडे नायिका : जाणसी माझे नाही आढेवेढे नायक : प्रीतीची आण जडे? नायिका : प्रीतीची आण जडे ।ध्रु।
नायिका : | तू अन् मी प्रेमपथावर सोबती मन नेई तिकडे पद हे चालती |
नायक : | चालताना जर का रस्ता चुके पोहोचू कोठे ते ना माहिती |
नायिका : | हे प्रेमाने थोडे, हे ऋतूने थोडे ।१। |
नायक : | मन वेडे ... |
नायक : डोळ्यातुन तव संजीवन ओघळे
हे जे घडले ते सारे त्यामुळेनायिका : किमया ही प्रेमकटाक्षांची प्रिया,
भोळ्या हृदयाला माझ्या ना कळेनायक : जन्मातुन एखादे, दैवे हे प्रेम घडे ।२। नायिका : मन वेडे ...
नायिका : | काय करू मन एकावर भाळले माझ्या हृदयाला त्याने व्यापले |
नायक : | पाह्यले हासुन कोणी एकवार कोणाला मन मागे ते लाभले |
नायिका : | श्वासातुन आग दडे, कंठातुन गीत दडे ।३। |
नायक : | मन वेडे ... |
चाल : मूळ गाण्याचीच! (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल )
साधारणपणे चाली अश्या :
प्रारंभिक द्विपदी :
गागालगालगागा - गागालगालगा
ध्रुवपद :
गा-गा-गा - गागागागागा
गाऽलगागागा - गागागागागा
गागागा गागागा - गागागा गागागा
कडवीः
गागागा गागागागा गाऽलगा (ओळी १ ते ४)
गागागा गागागा - गागागा गागागा (ओळ ५)
(मूळ गाण्यात आणि भाषांतरात काही ठिकाणी गागागा ऐवजी गाऽलगा असे वापरले आहे. )
विनंती :
१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.
२. फक्त गाणे ओळखू नका. (किंवा नुसते अभिनंदन करूनका काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे
)
३. ध्रुवपदाचे भाषांतर सुचल्यास तेही कळवा