थोडा समय आहे...

 

पाश हे तुटण्यास थोडा समय आहे...
पापण्या मिटण्यास थोडा समय आहे...
 

 

नजर ही हटण्यास थोडा समय आहे
पारणे फिटण्यास थोडा समय आहे

 

मान्य! हा अंधार आहे भोवती; पण-
तांबडे फुटण्यास थोडा समय आहे

 

मी असा आधीच का घायाळ झालो?
(तीर ते सुटण्यास थोडा समय आहे!)

 

 घेतले ऐकून त्यांनी बोलणे; पण-
बोलणे पटण्यास थोडा समय आहे...

 

कुमार जावडेकर

 

 

मराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं
The views expressed here are strictly personal and manogat administration does not necessarily subscribe to them.