आले थेंबा थंबातून निरोप आता
होतील विरहाचे समारोप आता... ॥धृ॥
सरतील गात्रातले ग्रीष्म आता
विझतील ओठातले जाळ आता
शमतील वेदनांचे प्रकोप आता....॥१॥
खेळतील देहावरी तुषार आता
सजतील ओठावरी मल्हार आता
होतील भेटण्याचे खटाटोप आता....॥२॥
लपतील पापण्यात आसवे आता
सजतील अधर तुझ्या स्वागता
होतील संकोचाचे विलोप आता....॥३॥
घडतील ओले अपराध आता
मिळतील ओल्याच शिक्षा आता
येतील ह्या जगाचे आरोप आता....॥४॥
जयंता५२