ये पहाट मंतरलेली मी तिचा रक्तिमा झाले मी लाजलाजरी झाले
लेवुनी पहा किरणांना मी फूलपाकळी झाले मी प्रीतबावरी झाले
सागरास धरणी मिळते ते क्षितिज कधी मी झाले मी सांज हासरी झाले
सावळा हरी राधेचा हे अंगण गोकुळ झाले मी धुंद बासरी झाले
मुक्तछंदा