सोडला मी भरतार (विडंबन)

खोडसाळ


आमची प्रेरणा : 'मराठा तितुका मेळवावा' या चित्रपटातील गाणे "शूर अम्ही सरदार अम्हाला काय कुनाची भीती ?"

 


सोडला मी भरतार, मला ग काय कुनाची भीती ?
बेवड्यास त्या बडवाया पायताण घेतलं हाती !   ॥ध्रु॥

आईच्या गर्भात उमगली झॅंटीपीची रीत
सॉक्रॅटिसशी लगिन लागलं, घडलं वर आक्रीत

त्याच्यापायी डझनावारी पोरं, नातू, नाती !  ॥१॥
ढोसावं अन् निजुन पडावं हेच मढ्याला ठावं

रोखिनहि प्यावं, उधारहि प्यावं हेच मढ्याला ठावं
चिलिम फुंकुनी झाली आहे अस्थिपंजर छाती !  ॥२॥