नोकरशाही
गद्य साहित्य
कथा
उषःकाल होता होता...
कंत्राट
ती
बॉम्ब
माणकेश्वराचा पुतळा
मि. क्विन ह्यांचे आगमन
रात्र !
ललित
अतुल अलवानी---एक नक्षत्र
अंकल सॅमला तुमची गरज नाही!
कार्निवालची जत्रा
दंतमनोरंजन
नोकरशाही
सफर लेह-लडाखची
या वर्षी विजयादशमी जोरात करायची
लेख
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म
पाटलांच्या गोष्टी
भाषा... नव्याने अनुभवताना!
लेणी संस्कृत साहित्याची
मी माझी खुर्ची आता संचालकाच्या बाजूला ओढून घेतली. "हे पाहा साहेब, प्लीज डू नॉट बी पर्सनल. पैसा आणणार कोठून आम्ही?"
"मी इतक्या दुरून तुमच्याकडे वेळ काढून आलो आणि तुम्ही माझ्यासाठी एवढे पण नाही करू शकत?"
"तुम्ही तुमचे काम केले. आता आमचे आम्हाला करू द्यात." मी.
"ते काही मला ठाऊक नाही, तुम्हाला हे करावेच लागेल."
"प्रयत्न जरूर करू, प्लीज आमच्यावर विश्वास ठेवा."
"मला प्रयत्न नकोत, रिझल्टस हवेत. कुठूनही पैसे उभे करा."
"अगोदरच तुमचे डिपार्टमेट खोट्या डिमांड्स काढून त्रास देते आहे. आम्ही आमचे काम करू की डिमांड्सना उत्तरे देत बसू? " मी.
"अशा कोणत्या डिमांड्स आहेत? मी तर नाही ऐकले? काय सांगताय काय तुम्ही?"
"नोशनल इंटरेस्ट. जर आम्ही ग्राहकांकडून ऍडव्हान्सेस घेतले, तर त्या रकमावर तेरा टक्के नोशनल इंटरेस्ट - व्याज गृहीत धरून तुम्ही त्या व्याजावर एक्साईज ड्यूटी भरायला डिमांड नोटीसेस पाठवता. ऍडव्हान्स घ्यावेत तर डिमांड येते. डिमांड येते म्हणून ऍडव्हान्स नाही घेऊ शकत. ऍडव्हान्स नाही घेतला तर पैसे कसे उभे करणार? आणि आता तुम्ही म्हणताय की पैसे उभे करा म्हणूण. आता कसे उभे करणार पैसे आम्ही? धंदा कसा करायचा आम्ही? आजच्या तारखेला ऐंशी लाखाच्या डिमांड्स पेंडिग आहेत गेल्या पाच वर्षातल्या. त्याचे काय करणार बोला? रद्द करू शकता या डिमांड्स?" मी. खरे तर त्याना डिमांड्स रद्द करायचा अधिकारच नाही.
"काय बोलताय काय?"
बाजूला बसलेल्या एका असि. कमिशनरना, नेगींना त्यानी विचारले, "इज इट ट्रूऽऽ?" जणू त्यांना काही ठाऊकच नव्हते. खरे तर हा इशू कमिशनरपासून शिपायांना, सगळ्यांना ठाऊक होता. हे साहेब वेड पांघरून पेडगावला निघाले होते.
"हां साब." नेगीसाहेब - त्याच्याबरोबर आलेले आमच्या विभागाचे असि. कमिशनर. उद्गारले, "लेकिन सभी को है ये डिमांड्स."
"या बाबतीत आम्ही तुम्हाला नक्की मदत करू सुधीरसाहेब." आर. के.
"मदत नकोय आम्हाला, न्याय पाहिजे. या सर्व डिमांड्स तद्दन खोट्या आहेत. तुम्हा सगळ्यांना ठाऊक आहे ते. तुम्ही आम्हाला सांगताय की रिझल्ट्स पाहिजेत. पण स्वतः मात्र काहीही ठोस शब्द देत नाही. हे बरोबर नाही. आमच्याकडून ठोस शब्द पाहिजे असेल तर तुम्हीही ठोस शब्द दिला पाहीजे. आम्हाला आमचा व्यवसाय शांतपणे करायचा आहे पण तुम्ही लोक आम्हाला फक्त सतत त्रास देत आहात."
माझा सडेतोड युक्तिवाद त्यांना अजिबात आवडला नाही. पण आमचे संचालक एकीकडे हे ऐकत होते आणि आता त्याचे फोनवर बोलून झाले होते. माझे शब्द ऐकून त्यांच्या चेहर्यावर समाधान झळकले.
"तुम्ही ड्यूटी पीएल ए मध्ये भरणार आहात की नाही?" स्वतःच्या वरिष्ठासमोर लाळ घोटणारा मनुष्य आमच्यावर वर्चस्व गाजवायला पाहात होता.
"पैसे असतील तर जरूर भरू. पण या डिमांड्सचे काय सांगा?"
"ते मी काहीही सांगू शकत नाही पण ड्यूटी तर पी एल ए मध्येच भरावी लागेल."
"धिस इज एक्स्ट्रा लीगल." मी. आता इतर जमवलेले ए.सी., सुपरिटेंडंट वगैरे अस्वस्थ. पण त्यांच्या आढ्यताखोर बॉसला मी दिलेली सडेतोड उत्तरे त्यांनाही आवडलेली. जणू त्यांना जे बोलता येत नव्हते ते मी बोलत होतो. आर. के. भडकलेले. पण त्यांना काय बोलावे सुचत नव्हते.
"पण आमचे नुकसान करून ड्यूटी पी एल ए मधे भरली तर तुम्हाला काय फायदा?" आता रागरंग ओळखून मी मुद्दा भलतीकडे वळवला.
"मग आमची रेव्हीन्यू ऍचिव्हमेट जास्त दिसेल." आर के.
"पण मग आकडेवारी उगीचच फुगेल आणि त्यामुळे मग पुढचे अंदाजपत्रक बनवताना अर्थखात्याची दिशाभूल होईल की." मी.
"तुम्ही जास्त बोलताय. सगळी ड्यूटी पी एल ए मध्ये भरणार की नाही बोला? मी एवढा दूर आलो आणि तुम्ही एवढेही नाही करू शकत?"
"एवढे सगळे अधिकारी आपापली कामे सोडून कामावर असताना इथे आले आहेत, आम्ही भरलेल्या करातून त्यांना वेतन मिळते. हा सार्वजनिक पैशाचा अपव्यय आहे. आणि मी जास्त नाही अगदी बरोबर बोलतो आहे. तुम्ही कायद्याच्या कक्षेबाहेर जाऊन वाटेल ते बोलावे आणि मी गप्प बसावे हे जमणार नाही. मी तुमच्या हाताखाली काम करीत नाही. मी जे काय बोलतो आहे ते अगदी बरोबर आहे. तरी आम्ही प्रयत्न करू. केवळ तुमच्या शब्दाखातर." मी.
हे मात्र त्यांच्या पचनी पडले नाही. वैतागून ते उठले, नाईलाजाने हस्तांदोलन करून निरोप घेतला. पण नंतर त्यांनी आमच्या मागे एक बोगस इन्क्वायरी लावली.
----
दिवाळी दोन आठवड्यावर आलेली. सुटे भाग पुरवायचे खाते उगीचच माझ्याकडे आलेले. गंमत आणि विरंगुळा म्हणून ते काम साताठ वर्षे जरा जादाच उत्साहाने केलेले. त्या कामाचा एक भाग म्हणून दिवाळीत 'विश' घालणारी भेटकार्डे पाठवावी लागतात. त्या मोसमी कामाच्या पुराने मी पुरता रंजीस आलेलो. दुपारचे पावणेचार वाजलेले. केव्हा एकदाचे पाच वाजतात आणि निघतो असे झालेले. कितीही काम असले तरी पाचला निघायचेच असा माझा खाक्या. मी सहसा कार्यालयाची गाडी वापरीत नाही. मग सार्वजनिक वाहनातून गर्दी होण्यापूर्वी परतीचा प्रवास करता येतो आणि प्रवासात वाचनही होते. पण एकदा का उशीर झाला आणि गर्दी वाढली की प्रवासातले वाचन नीट होत नाही. अंधेरी पूर्वेला द्रुत महामार्गावर - हायवेवर एक पूल - फ्लाय ओव्हर होत होता आणि सलग तीन वर्षे वाहतुकीची पार वाट लागली होती. साडेतीन किलोमीटरचे अंतर पार करायला तासतास लागत असे. अणि अपघात वगैरे झाला तर विचारायलाच नको. एकदा साडेसहाला मी बसमध्ये बसलो तो नऊ वाजता अंधेरीला पोहोचलो. सुदैवाने मस्त पुस्तक हातात होते ते बरेचसे वाचून झाले. बहुधा विश्वास पाटलांचे 'पानिपत' असावे. वि. ग. कनिटकरांचे 'नाझी भस्मासुराचा उदयास्त', पाटलांचेच 'महानायक', लिझ मेईटनरचे चरित्र, किरण बेदीचे 'आय डेअर', इ. मस्त पुस्तके मी वाहतुकीच्या खोळंब्याला दुवा देत वाचली. तसा काय मोठासा फरक पडतो? घरी जाऊन वाचायचे ते बसमध्ये वाचले. फक्त जोडीला चहापाणी वा तोंडात टाकायला शेंगदाणे नव्हते. वाहतुकीच्या खोळंब्याला दुवा देणारा मी अंधेरीचा तरी बहुधा एकमेव माणूस असणार. असो. विषयांतर झाले. लवकर घरी पोहोचले की वाचन, चिंतन, मनन, लेखन, संगीतादी छंदाना न्याय देता येतो. खेळ आणि विज्ञान, कला, साहित्य, संगीत वगळता चित्रवाणीच्या कार्यक्रमाशी माझे तसे वावडेच. लवकर जेवून लकर झोपले की दुसर्या दिवशी सकाळी लकर उठून प्रभातफेरी आणि पुन्हा हे छंद जोपासता येतात. माझे स्नेही आमच्या कंपनीचे हिशेबनीस ऊर्फ अकाउंटंट श्री. राशिनकर यांना मी गमतीने म्हणत असे की अकार्यक्षम माणसांनाच उशिरा काम करावे लागते. प्रसंगी कामाचा वेग वाढवून बरोबर पाचला काम संपवू शकतात ते खरे कार्यक्षम. ते उत्तर देत की आळशी कामचुकार माणसे काम टाकून वेळेवर पाचला पळतात. अर्थाच हा सारा गंमतीचा भाग आहे. लकर झोपणेव, लकर उठणे व उशिरा झोपणेव, उशिरा उठणे इ. जीवनशैली प्रत्येकाची वेगवेगळी असते आणि त्यात श्रेष्ठ कनिष्ठ ठरवायचा कोणालाही अधिकार नाही. दोन्ही जीवनशैलीत सारख्याच कार्यक्षम आणि यशस्वी व्यक्ती आढळतात.