अंकल सॅमला तुमची गरज नाही!
गद्य साहित्य
कथा
उषःकाल होता होता...
कंत्राट
ती
बॉम्ब
माणकेश्वराचा पुतळा
मि. क्विन ह्यांचे आगमन
रात्र !
ललित
अतुल अलवानी---एक नक्षत्र
अंकल सॅमला तुमची गरज नाही!
कार्निवालची जत्रा
दंतमनोरंजन
नोकरशाही
सफर लेह-लडाखची
या वर्षी विजयादशमी जोरात करायची
लेख
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म
पाटलांच्या गोष्टी
भाषा... नव्याने अनुभवताना!
लेणी संस्कृत साहित्याची
स्कनेक्टडीला पोहोचल्यावर मी हान्स बेथ कडे गेलो. मला पाहिल्यावर तो हसत पुढे आला आणि म्हणाला, "काय डिक, पास झालास नं?" मी गंभीर चेहऱ्याने नकारार्थी मान हलवली. त्याचाही चेहरा चिंताक्रांत झाला. त्याला वाटलं की मला काही तरी गंभीर आजार झाला आहे की काय? तो काळजीच्या सुरात म्हणाला, "डिक, काय झालं?" मग मी माझी तर्जनी माझ्या कपाळाजवळ नेली.
तो म्हणाला, "नाही!"
"हो!"
"नाऽऽऽऽऽऽही!"
मग सगळं सांगितल्यावर तो इतक्या जोरजोरात हसायला लागला की जनरल इलेक्ट्रिक कंपनीचं छप्पर उडायची वेळ आली! ज्यांना ज्यांना मी ही हकीगत सांगितली त्यांच्यापैकी एकदोन अपवाद सोडून सगळेच पोट धरून हसले.
मी जेव्हा न्यूयॉर्कला परत गेलो तेव्हा विमानतळावर माझे आई, बाबा आणि बहीण आले होते. घरी जाताना गाडीत मी त्यांना सगळं सांगितलं.
ते ऐकल्यावर आई काळजीच्या सुरात बाबांना म्हणाली, "आता आपण काय करायचं?"
बाबा म्हणाले, "करायचंय काय त्यात! हे सगळंच हास्यास्पद आहे!" आणि ते तेवढ्यावरच थांबलं.
पण नंतर माझी बहीण मला म्हणाली की घरी गेल्यावर बाबा आईला म्हणाले, "तू डिकसमोर असं विचारायला नको होतंस. त्याला काय वाटलं असेल? बरं, ते असू दे, पण आता आपण काय करायचं?"
त्यावर आई म्हणाली, "करायचंय काय त्यात! हे सगळंच हास्यास्पद आहे!"
माझी गोष्ट ऐकून जिला काळजी वाटली अशी आणखी एक व्यक्ती होती. म्हणजे त्याचं असं झालं. काही दिवसांनी भौतिकशास्त्रज्ञांची एक बैठक होती. त्याला माझे एम.आय.टी.मधील प्राध्यापक, प्रा.स्लेटर आले होते.
ते मला म्हणाले, "अरे फाईनमन, तुझ्या त्या वैद्यकीय तपासणीची गोष्ट आम्हाला सांग की! आम्ही त्याच्याबद्दल थोडंफार ऐकलंय, पण तू आता सविस्तर सांग."
मी रात्रीच्या जेवणानंतर तिथे जमलेल्या सर्वांना सगळी गोष्ट तपशीलवार सांगितली. प्रा.स्लेटर सोडले तर कोणीच माझ्या माहितीचं नव्हतं पण सगळ्यांची हसून हसून पुरेवाट झाली.
एक गृहस्थ मात्र सगळं संपल्यावर गंभीर चेहरा करून म्हणाले, "कदाचित त्या मानसोपचारतज्ज्ञांच्या म्हणण्यात काही तथ्य असेल."
एक भौतिकशास्त्रज्ञ असं म्हणतोय याचं मला फारच आश्चर्य वाटलं. म्हणून मी त्यांना विचारलं, "सर, आपला व्यवसाय काय?"
ते गृहस्थ जरा ओशाळे होत म्हणाले, "खरं म्हणजे मी इथे हजर असण्याचं तसं काही कारण नाही. पण माझा भाऊ भौतिकशास्त्रज्ञ आहे आणि मी त्याचा पाहुणा म्हणून इथे आलो आहे. मी स्वतः मानसोपचारतज्ज्ञ आहे!"
असं काही तरी असेल असं मला वाटलंच होतं!
काही दिवसांनंतर मी झाल्या प्रकाराचा पुन्हा विचार करायला लागलो आणि मला चैन पडेना. युद्धकाळात मला सैन्यात भरती होता आलं नव्हतं कारण माझ्या वरिष्ठांनी संबंधित अधिकाऱ्यांना पत्रं पाठवून कळवलं होतं की "आमच्या प्रकल्पातील फार महत्त्वाचं काम ह्या मुलाकडे आहे. त्यानं इथे उपस्थित असणं अत्यंत गरजेचं आहे. आम्ही त्याला सोडू शकत नाही." आणि आता तोच मुलगा वेडा, मनोरुग्ण ठरला आहे. तिथले वरिष्ठ अधिकारी हे पाहून म्हणतील, "नक्कीच काहीतरी भानगड आहे. बहुतेक हा मुलगा सैन्यात जायला नको म्हणून हे सोंग करत असेल. पण आम्हीही काही कमी नाही. आम्ही त्याला घेतल्याशिवाय राहाणार नाही!"
माझ्या डोक्यात हे असेच विचार सारखे चालले होते. मला चैन पडेना. आता ह्या गुंत्यातून सुटायचं कसं? विचार करकरून शेवटी माझ्या डोक्यात एक कल्पना आली. मी कागद आणि पेन घेतलं आणि संबंधित अधिकार्यांना एक पत्र लिहिलं. त्याचा आशय साधारण असा होता :
मी आपणास सांगू इच्छितो की मी विद्यापीठात विज्ञान हा विषय शिकवतो. मला असे वाटते की भावी वैज्ञानिकांचा देशाच्या प्रगतीमध्ये मोठा वाटा असतो. मी ह्याला हातभार लावत असल्यामुळे मी देशकार्यासाठी सैन्यातच भरती व्हायला पाहिजे असे मला वाटत नाही. तरीही मी सैन्यात भरती होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय तपासणीसाठी गेलो होतो. तिथे मला 'मानसिक दृष्ट्या अपात्र' असे ठरवून स्वीकारले गेले नाही. मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की ह्या प्रकारात फार मोठी चूक झाली आहे. माझ्यामध्ये काही वेडेपणा असेल तर तो इतकाच की ह्या चुकीचा फायदा न घेता ती चूक मी आपल्या निदर्शनाला आणून देत आहे.
ह्या सगळ्याचा परिणाम??
निकाल : तूर्तास अस्वीकृत. कारण : वैद्यकीय दृष्ट्या अपात्र.