उषःकाल होता होता...
गद्य साहित्य
कथा
उषःकाल होता होता...
कंत्राट
ती
बॉम्ब
माणकेश्वराचा पुतळा
मि. क्विन ह्यांचे आगमन
रात्र !
ललित
अतुल अलवानी---एक नक्षत्र
अंकल सॅमला तुमची गरज नाही!
कार्निवालची जत्रा
दंतमनोरंजन
नोकरशाही
सफर लेह-लडाखची
या वर्षी विजयादशमी जोरात करायची
लेख
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म
पाटलांच्या गोष्टी
भाषा... नव्याने अनुभवताना!
लेणी संस्कृत साहित्याची
थर्मनच्या या बोलण्यावर बीनायने मान डोलावली आणि तो म्हणाला, "सर, आम्हाला सगळ्यांना असं वाटतंय की थर्मन जे काही म्हणातोय ते बरोबर आहे. गेले दोन महिने आपण सगळे या प्रकल्पावरच काम करत आहोत आणि त्यात कुठे काही त्रुटी राहिल्या नाहीत ना याची खातरजमा करून घेतो आहोत. आता ह्यात एखादी चूक निघण्याची शक्यता लाखात एखादी असेल. आपली आकडेमोड अचूक आहे आणि त्यात जर काही उणं-अधिक झालंच असलं, तर ते सुधारण्यासाठी आपण प्रयत्न करू या. "
टेबलाभोवती जमलेल्या लोकांनी एकमताने याला दुजोरा दिला. ऍटनचं तोंड अचानक कडू झालं. हा कडूजहर घोट त्यांना टाकवेना की गिळवेना. त्यांनी आपले दोन्ही हात आपल्या पाठीशी एकमेकांमध्ये गुंफले होते. असंख्य सुरकुत्यांचं जाळं पसरलेला त्यांचा वयोवृद्ध चेहरा कसल्या तरी निश्चयाने एकदम ताठ झाला. "ठीक आहे. तुझा हट्टच असेल तर थांब तू. पण आमच्या कामामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा आणायचा प्रयत्न करू नकोस. अजूनही मी या वेधशाळेचा संचालक आहे. आणि एक लक्षात ठेव. वर्तमानपत्रातल्या तुझ्या स्तंभात तू काय वाट्टेल ते लिहीत असलास तरी इथे असेपर्यंत तुझी मतं तुझ्याजवळच ठेवलीस तर फार बरं होईल. इथे असेपर्यंत मी सांगितलेल्या गोष्टी पाळून तुला आम्हाला सहकार्य करावं लागेल.... "
ऍटनना आणखीही बरंच कायकाय बोलायचं असावं. तेवढ्यात ...
" हॅलो! हॅलो!! हॅलो!!! काय मंडळी काय म्हणताय? अरेच्या! तुम्ही सगळे इतके सुतकी चेहरे करून काय बसलाहात? तब्येती बऱ्या आहेत ना सगळ्यांच्या? " पलिकडून आलेल्या या आवाजाने त्यांना थांबवलं. एक चांगला गब्दुल माणूस आत आला. त्याच्या हसऱ्या चेहऱ्यावर सुखवस्तूपणा ओसंडून वाहत होता. हसताना त्याचे तुकतुकीत गाल प्रकाश हलेल तसे चकाकत होते.
ऍटननी एकदम दचकून त्याच्याकडे पाहिले. "अरे शीरिन! तू इथे काय करतोयस? तू आपल्या छावणीतच थांबणार होतास ना? "
शीरिनने यावर नुसतेच एक स्मितहास्य केले आणि एका खुर्चीत आपला देहविस्तार माववत त्याने फतकल मारली.
" जळो ती छावणी. आपण तर कंटाळलो बुवा तिथे बसून. तिथे असं लपून बसण्यापेक्षा इथे येणं केव्हाही उत्तम असं माझं स्पष्ट मत आहे. इथे आलं की कसं युद्धाबिद्धाच्या आघाडीवर आल्यासारखं वाटतं. त्यातून या संप्रदायवाल्यांनी ओरडून ओरडून अगदी 'बाऊ' करून ठेवलेले ते तारे नक्की असतात तरी कसे हे बघायची मला प्रचंड उत्सुकता आहे."
त्याने आपले हात एकमेकांवर जोराने घासले आणि तो स्वतःशीच पुटपुटला, " बाहेर अगदी बर्फाळ हवा पडली आहे. वारं तर इतकं बोचरं आहे की नाकातली हवा गोठेल असं वाटतं आहे. इतक्या लांबून बीटाची ऊब अगदीच अपुरी आहे... "
यावर ऍटनने हताश झाल्यासारखी आपली मान जोराने हलवली. आणि वैतागून ते म्हणाले, "शीरिन, दर वेळी सांगितलेल्या गोष्टींपेक्षा भलतं काहीतरी करायलाच हवं का? आता या वेळी इथे तुझं काय काम आहे? "
"आता इथे माझं काय काम आहे? " शीरिन अजूनही चेष्टेच्याच सुरात बोलत होता.. त्याने नाटकी हताशपणे आपले दोन्ही पंजे ऍटनसमोर पसरले. " आपल्या छावणीमध्ये माझ्यासारख्या मानसोपचारतज्ज्ञाचं काय काम आहे? त्या लोकांना चांगलं मनुष्यबळ हवं. सशक्त आणि सुदृढ मुलं जन्माला घालू शकतील अशा बायका हव्यात. माझ्या देहविस्ताराकडे बघता अंगमेहनतीची कामं मला जमायची नाहीत आणि नुसतीच मुलं जन्माला घालण्याच्या उपयोगी मी पडू शकत नाही. मग तिथे थांबून उगीचच एक खाणारं तोंड मी कशाला वाढवू? मी आपला इथेच बरा आहे. "
"ही कुठली छवणी आहे सर? " थर्मनने मध्येच विचारलं.
आता कुठे शीरिनचं लक्ष पहिल्यांदा थर्मनकडे गेलं. त्याने विचारलं, "कोण आपण? "
"हा थर्मन ७६२. सध्याचा बिनीचा बातमीदार. याचं नाव तर तू ऐकलंच असशील... " नको असलेली गोष्ट करायची सक्ती झाल्यावर एखादा माणूस जशी आदळ-आपट करेल तसा चेहरा करून ऍटन म्हणाले.
थर्मनने झटकन आपला हात पुढे केला आणि शीरिनशी हस्तांदोनल करून तो म्हणाला, " तुम्ही शीरिन ५०१ आहात ना? सारो विद्यापिठातले जगप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ! मी बरंच ऐकलंय तुमच्याबद्दल....सर, हे छावणीचं काय म्हणत होतात तुम्ही? "
"त्याचं असं आहे, की आमचं हे जे 'भाकित' आहे, शापवाणी म्हणा हवं तर, ते अटळ आहे हे आम्ही लोकांना सांगतो आहोत. त्यातल्या काही लोकांना या गोष्टीची सत्यता पटली आहे. या लोकांमध्ये इथे काम करणाऱ्यांच्या घरची मंडळी मोठ्या प्रमाणावर आहेत. काही बाहेरचे लोकही आहेतच. या सगळ्यांची संख्या सुमारे तीनेकशे असेल. बायका आणि लहान मुलांची संख्या खूप जास्त म्हणजे जवळजवळ तीन चतुर्थांश इतकी आहे. "
"आलं लक्षात. तुम्ही या सगळ्या लोकांना अशा एखाद्या सुरक्षित ठिकाणी हलवलंय जिथे अंधार आणि हे 'तारे' त्यांना गाठू शकणार नाहीत. बरोबर? म्हणजे बाकीच्या सृष्टीचा सर्वनाश झाला तरी हे लोक सुखरूप राहतील... " थर्मनने एक सुस्कारा सोडला आणि नुकत्याच कानी आलेल्या गोष्टींवर विचार करत तो बराच वेळ शांत बसून राहिला. ऍटनच्या टेबलाभोवती जमलेल्या मंडळींनी एव्हाना बुद्धिबळाचा एक पट उघडला होता. एक अक्षरही न बोलता तिथे असलेल्या सहा लोकांनी त्या अनोख्या पटावर बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. सगळ्यांचीच नजर पटावर अगदी एकाग्रपणे लागलेली होती आणि विद्युत्वेगाने सटासट चालींवर चाली खेळल्या जात होत्या. ऍटन आणि शीरिन मात्र टेबलाच्या एका कोपऱ्यात उभे होते. त्यांचं आपापसात अगदी हळू आवाजात काहीतरी बोलणं चाललं होतं. थर्मन काही वेळ त्या बुद्धिबळाच्या पटाचं आणि खेळाडूंचं निरीक्षण करत उभा राहिला. मग त्याने ऍटन आणि शीरिनच्या दिशेने आपला मोर्चा वळवला.
त्यांच्याजवळ जाऊन तो म्हणाला, " सर, मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. या सगळ्यांना आपला त्रास होणार नाही अशा एखाद्या ठिकाणी आपल्याला बसता येईल का?"
ऍटननी त्रासिक चेहरा करून थर्मनकडे पाहिलं. पण ते काही बोलणार तेवढ्यात शीरिननेच बोलायला सुरुवात केली.
"काहीच हरकत नाही. मला आवडेल तुझ्याशी बोलायला. तशीही बडबड करायला मला आवडते. मला फार बरं वाटतं कोणाशीतरी बोलल्यावर . आताच ऍटन मला तुझ्याबद्दल सांगत होते. आमचे जगबुडीचे निष्कर्ष चुकले तर काय होईल याबद्दलचा तुझा अंदाज बरोबर आहे. माझंही मत तुझ्यासारखंच आहे . बाकी, मी तुझे लेख नेहमी वाचतो. आवडतात मला. बरेचदा आपली मतंही जुळतात. "
"शीरिन, प्लीज.... " ऍटन कळवळलेच.
"काय झालं?... ठीक आहे, आपण त्या पलिकडच्या खोलीत जाऊ या. तिथल्या खुर्च्या इथल्यापेक्षा चांगल्या आहेत... "
पलिकडच्या खोलीतल्या खुर्च्या खरंच आरामशीर होत्या. त्या खोलीला आतून लालबुंद पडदे लावलेले होते. तिथे एक काळपट लाल रंगाचा गालिचाही घातलेला होता. बीटाच्या तांबड्या प्रकाशात त्या खोलीच रूप रक्ताने माखल्यासारखंच दिसत होतं.
आत शिरल्यावर शीरिनने आपले खांदे उडवले. " काही क्षणांसाठी पांढरा प्रकाश मिळावा म्हणून दहा दमड्या खर्चायची सुद्धा माझी तयारी आहे. आता गॅमा आणि डेल्टा आकाशात असते तर किती बरं झालं असतं.... "
"विचार काय विचारायचंय ते... पण एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्याकडे वेळ नाहीये. अजून तासाभरातच वरच्या मजल्यावर, निरीक्षणकक्षात जायची वेळ होईल. आणि त्यानंतर बोलायला वेळच उरणार नाही. " ऍटन आपल्या स्वरातला तुसडेपणा किंचितही कमी न करता म्हणाले.
"ठीक आहे. विचारतो. " असं म्हणून थर्मनने हातांची घडी घातली. " तुम्ही सगळे या गोष्टीकडे इतक्या अनन्यभावाने बघताहात की त्याचा माझ्यावरही परिणाम झाला आहे. तुमच्या सांगण्यावर विश्वास ठेवायला हवा असं मलाही आता वाटायला लागलं आहे. मला थोडीशी पार्श्वभूमी समजावून सांगाल का? हा सगळा काय प्रकार आहे? "
आता मात्र ऍटनच्या संतापाचा स्फोट झाला. " याचा अर्थ इतके दिवस आम्ही घसा फोडून जे काही सांगतो आहोत, त्याच्याबद्दल काहीच माहिती मिळवायचे कष्ट न घेताच तू आमच्यावर चिखलफेक चालवली होतीस? "
थर्मन ओशाळं हसला. "असं काही नाहीये सर. मला यातली बऱ्यापैकी माहिती आहे. आता अवघ्या काही तासांतच आपल्यावर अंधाराची अशी एक सावली पडणार आहे, जी सगळ्याच मानवजातीला अगदी वेडंपिसं करून सोडेल असं तुमचं भाकित आहे. हे माहितेय मला. पण असं म्हणण्यामागे काय शास्त्रीय कारणं आहेत हे मला जाणून घ्यायचं आहे."
"थांब, थांब. जरा थांब. आता तू ऍटनना यामागची शास्त्रीय कारणं विचारत बसलास, आणि त्यांनी तुझ्या प्रश्नांना उत्तरं दिलीच तर अनेक आकडेमोडींचं आणि आलेख - आकृत्यांचं एक भेंडोळं ते तुझ्यासमोर टाकतील. त्यातलं काहीच तुला समजणार नाही. हा प्रश्न तू मला विचार. मी तुला हे सगळं अगदी सोप्या शब्दांत समजावून सांगतो. " शीरिन मध्येच म्हणाला.
"बरं, तुम्ही सांगा ... " थर्मन.
"त्याच्या आधी मला काहीतरी प्यायला हवंय ... "
"पाणी चालेल? " ऍटननी घुश्श्यात विचारलं.
" तुम्ही माझी चेष्टा करताय का सर.... "
"तुझीच चेष्टामस्करी बास कर आता. आज दारू पिण्यावर बंदी आहे. मुळातच आज लोकांचं लक्ष कामावरून उडणं अगदी साहजिक आहे. आज माझ्या हाताखालच्या लोकांनी पूर्णपणे झोकून देऊन आपापलं काम केलेलं मला हवं आहे... "
काही न बोलता शीरिनने नुसतीच मानेनेच संमती दाखवली आणि आपल्या भेदक नेत्रांनी थर्मनकडे रोखून बघत त्याने बोलायला सुरुवात केली. "थर्मन, आपल्या लगाशवर वेळोवेळी नांदलेल्या संस्कृतींचं निरीक्षण केलं तर त्यांच्यात आपल्याला एक चक्राकार गती दिसते हे तुला माहीतच असेल. यातल्या 'चक्राकार' या शब्दातच खरी मेख आहे. "
"हो, मीही याबद्दल ऐकलंय. तुम्ही म्हणताय तो विचार अलिकडेच इतिहासतज्ज्ञांनी मांडला आहे. पण या सिद्धांताला सर्वानुमती मिळाली आहे का? " आपल्या बोलण्याला उद्धटपणाचा वास येऊ नये अशा बेताने थर्मनने विचारलं.