सुनीता विल्यम्स भारतीय नाही.

सुनीता विलियम्स सुखरूप परतो ही ईश्वरचरणी प्रार्थना

सुनीता विलियम्स बद्दल च्या बातम्या भारतीय वृत्तपत्रांत वाचून कुतूहल वाटले. सुनीता बद्दल चे प्रेम हे नक्की कशामुळे? सुनीता चा जन्म ओहायोचा. तिचे वडील १९५८ ला देश सोडून गेलेत व आई स्लोवेनियाची. सुनीता भारतीय नागरिक कधीच नव्हती व भविष्यात होईल असे वाटत नाही. या सर्वाचा विचार केल्यास तिच्याबद्दलची आपुलकी ही अज्ञानातून की ती इश्वरभक्त  हिंदू आहे म्हणून की तिला भारतीय म्हटले की तिचे यश लाटता येते म्हणून.

अज्ञानातून असल्यास फार चर्चा करण्यात अर्थ नाही.

हिंदू धर्मीय म्हणून कौतुक असल्यास तसे म्हणावे

यश लाटण्याचे कारण असल्यास अशा वृत्तींची कीव येते. कारण याच देशात देशातील एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाऊन यशस्वी झालेल्याबद्दल प्रेम/आदर/आपुलकी दूर राहिली पण तिरस्कार वाटतो

परदेशी संस्कृतीबद्दल तिरस्कार मग परदेशी यशात वाटा का हवा?

सुनीता अंतंब्राह्य अमेरिकन आहे

मनकवडा