युद्ध ताऱ्यांचे की भिकाऱ्यांचे?

झी मराठीवर युद्ध ताऱ्यांचे नावाचा एक भिकार कार्यक्रम नुकताच पार पडला. नट असतील तर त्यांनी अभिनय करावा. त्यांची शिकाऊ गाणी प्रेक्षकांनी का म्हणून ऐकून घ्यायची? आणि सारखे एसेमेस द्या हो, एसेमेस द्या हो म्हणून स्पर्धकांचा आणि निवेदकनामक दलालांचा काय टाहो चालला होता? ह्यापेक्षा जगन्नाथपुरीच्या देवळाबाहेरचे भिकारी बरे. सरळ भिकारी म्हणून भीक मागतात.

अर्थात असले कार्यक्रम पाहणारे आणि एसेमेस पाठवणारे आपण प्रेक्षकही तितकेच मूर्ख आहोत नाही का?