राम सेतू

गेले काही दिवस हिंदुत्ववादी संघटना राम सेतू या विषयावर प्रचंड प्रमाणात आंदोलन करीत आहेत. (प्रचंड अशासाठी की रास्ता रोको सारख्या जनाअंदोलनांपासून उच्चभ्रू समाजासाठीच्या परिसंवादापर्यंत (ईंग्रजीतून) अनेक कार्यक्रम चालू आहेत) अशाच एका कार्यक्रमास जाण्याचा योग आला. सुब्रह्मण्यम् स्वामी मुख्य वक्ता होते. तेव्हा लक्षात आलेले काही मुद्दे इथे मांडत आहे.

१. रामसेतू हा हिंदू अस्मितेचा विषय आहे.
२. रामसेतू हे ऐतिहासिक बांधकाम असून त्याचा कालावधी सुमारे ९००० वर्षांचा आहे. (साडे तेरा लाख हे खडक निर्मितीचे (रॉक फ़ॉर्मेशन) वय आहे).
३. पुराणांतील उल्लेख हे प्राथमिक पुरावे म्हणून मानले जातात.
४. वापरलेले दगड तेथे नैसर्गिक रित्या मिळत नाहीत. तसेच बांधणीची पद्धत नैसर्गिक नाही.
५. हा सेतू इसवी सनाच्या १५ व्या शतकापर्यंत वापरात असल्याचे पुरावे आहेत.

६. प्रस्तावित प्रकल्प कालवा हा आंतरराष्ट्रीय मार्ग बनेल आणि भारतीय नौसेनेचा ताबा नष्ट होइल.
७. हा मार्ग अधिक खर्चिक असून पर्यायी मार्ग अधिक स्वस्त तसेच सार्वभौमत्वाला धक्का न पोहोचवणारा आहे.
८. राम सेतू नष्ट झाल्यास सागरी जीवसंपदेची हानी होईल. तसेच स्थानिक मच्छीमारांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होतील.
९. त्सुनामीचा धोका वाढेल.

इत्यादी ऐतिहासिक, वैज्ञानिक, आर्थिक, सामरिक अनेक मुद्दे पुढे आले. पण शेवती एक वेगळाच भावनिक मुद्दा मांडला गेला तो म्हणजे यापुढे जेव्हा आपण आपल्या मुलांना रामायण कथा सांगू तेव्हा सेतूबद्दल काय सांगणार ? सेतू होता पण नंतर आपण तो तोडला. त्यांच्या मनात कशी काय रामायणाची गोडी निर्माण होईल ?

जेवढे आठवले ते लिहिले. या विषयावर देशभर चर्चा चाललेली असताना आपण मागे का ? त्यामुळे सर्व मनोगतींच्या मतांची प्रतीक्षा आहे.