सोप्या पद्धतीने मराठीत लेखन

विंडोजमध्ये मराठीत टाईप करायचे तर त्यासाठी कितीतरी सॉफ्ट्वेअर टाकावी लागतात. कॉन्फ्युगरेशन शिकावे
लागते. हाताशी विंडोजची सिडी असावी लागते. विंडोजमध्ये मराठीत टाईप करायचे
असेल तर किती सव्य / अपसव्य करावे लागतात ते इथे पहा.

दुवा क्र. १

हे सर्व वापरून नवीन माणूस मराठीत टाईप करायला लागेपर्यंत थकून जातो.
त्याचा इंटरेस्ट संपतो. हे सर्व टाळण्यासाठी मी युबंटूमध्ये आवश्यक ती सर्व
सॉफ्ट्वेअर आधीच इन्स्टॉल करून एकच एक पॅकेज बनविले आहे.

खाली दिलेल्या लिंकवरून युबंटूची आव्रुत्ती डाऊनलोड करून त्याची सीडी
बनवा. ही सीडी आपल्या कॉम्प्युटरमध्ये टाकून तो सुरू करा. आता युबंटू सुरू
होईल आणि सर्व मराठी आयुधे आपोआप उपलब्ध होतील. काम झाले की ही सिडी काढून
टाका व कॉम्प्यूटर परत चालू करा. आपली आधीची विंडोजची प्रणाली सहीसलामत परत
मिळेल.

gamabhana.s3.amazonaws.com/ubuntu-14.10-desktop-customised-i386.iso

या लाईव्ह सिडीमुळे आपल्या सध्याच्या प्रणालीला
कसलाही धक्का न लावता युबंटू आणि मराठी स्पेल चेक असे दोन्ही लाभ मिळवता
येतात. अर्थात हे फक्त मराठी सॉफ्टवेअर नसून ही पूर्ण युबंटू ऑपरेटिंग
सिस्टिम असल्यामुळे ही फाईल साईज आहे सुमारे २ जीबी ! आता इतकी मोठी फाईल
नेटवरून उतरवून घेणे शक्य नसेल तर मला आपला पत्ता कळवा म्हणजे मी ही
डीव्हीडी पोस्टाने पाठवून देईन. आणि हो, हे सॉफ्टवेअर पूर्णपणे मोफत आणि
मुक्त स्त्रोत आहे.

युबंटूच्या लिबर ऑफिसमध्ये मराठी टाईप आणि स्पेल-चेक कसा दिसेल ते खालील चित्रावरून स्पष्ट होईल.

इनपुट मेथड / लिबर ऑफिसमध्ये स्पेलचेक
या चित्रात सर्वात वरच्या बाजूला मराठी इनपुट मेथड (इन्स्किप्ट /
फोनेटिक) निवडण्याचा पर्याय दिसत आहे. मधल्या भागात लाल रंगावर राईट क्लिक
केल्यावर शुद्ध शब्दांचे पर्याय दिसत आहेत.

आपल्याला काही सुधारणा सुचवायच्या असल्या तर त्या देखील कळवा म्हणजे पुढच्या आवृत्तीत सुधारणा करता येतील.

पुस्तीः

मनोगतासारख्या संकेतस्थळावर बहुतेक सर्व लोक ब्राऊजरमध्येच ऑनलाईन लेखन
करत असावेत. पण जर आपल्याला ऑफलाईन लेखन करायचे असेल तर त्यासाठी याची मदत होईल. ऑफलाईन लेखनाचे फायदेही बरेच आहेत. आपण आपले लेखन नीट
सेव्ह करू शकतो, स्पेल चेक करू शकतो. अ‍ॅटो करेक्ट, अ‍ॅटो टेक्स्ट, ऍटो कंप्लीट वापरू
शकतो. पानेच्या पाने लिखाण करायचे असेल तर ही सीडी जरूर वापरून पहा. 

(तांत्रिक लेखन असल्यामुळे इंग्रजी शब्दांचा वापर अपरिहार्य)