मराठी पालकांची "भाषिक साठमारी"

१. व्हॉट इज रिलिजन? "वेल, रिलिजन इज डिफरंट वेज पीपल बिलीव्ह इन गॉड."


२. आय डोण्ट लाइक युनिफॉर्म्स. आय लाइक इट व्हेन एव्हरीवन वेअर्स क्लोद्स ऑफ देअर चॉइस. "दॅट्स हाउ वुई कॅन एक्स्प्रेस अवरसेल्व्हज."


३. "ही बिट्रेड."


वरील वाक्यं पहा.  विषेशतः अवतरणचिन्हांतली. अमेरिकेत माझ्या मुलीच्या चौथीच्या वर्गात झालेल्या चर्चांमधील ही वाक्यं आहेत. त्यांचं मराठीत भाषांतर करता येइल का? अर्थातच येइल. पण लहान मुलांना सहज समजेल असं? कठीण जाइल नाही? माझ्या मुलीला मराठी अगदी उत्तम येतं.


मला असं वाटतं की मुलांशी मराठीतून बोलताना आपण पालक काही शब्दप्रयोग किंवा भावना हातच्या राखून ठेवतो. जणूकाही ती केवळ मोठ्यांची मक्तेदारी आहे. मुलांना त्या भावना इन्ग्लीश्मधून कळत असतील तर मराठीतून का कळू नयेत? आपण मोठ्यांनी "पचायला हलकी" आणि "पचायला जड" अशी भाषेची वर्गवारी का करावी?


मुळात माझ्या निरीक्षणाशी सहमत आहात का?


या करड्या मजकुराकडे दुर्लक्ष करा. मनोगताला रोमन/देवनागरी टक्केवारीत गंडवण्यासाठी पुन्हा लिहीत आहे. 


(प्रशासनाची पुस्ती : अतिरिक्त रोमन मजकूर एकतर लिहू नये. आवश्यक तेवढा इंग्रजी मजकूर वर दुरुस्ती केलेल्या प्रमाणे लिहावा.)