म. गांधी सव्वाशे वर्षे जगते तर.....

महात्मा गांधींचे आयुष्य अतिशय शिस्तबद्ध होते. आपल्या आरोग्याविषयी त्यांना पूर्ण आत्मविश्वास होता. "मी सव्वाशे वर्षे जगणार आहे" असे त्यांनी म्हंटल्याचे माझ्या वाचनांत आले आहे.


म. गांधी सव्वाशे वर्ष जगते तर ते शेवटपर्यंत सार्वजनिक जीवनांत निश्चितच सक्रीय राहिले असते. मग काश्मीर प्रश्न, तिबेटचा प्रश्न व बांगला देशांतून आलेल्या निर्वासितांचा प्रश्न हे वेगळ्या तऱ्हेने हाताळले गेले असते का? त्याचा भारताच्या राजकीय नकाशावर काही परिणाम झाला असता का? भारतीय समाज आज कुठल्या स्थितींत असता?  


भावनेच्या आहारी न जाता वस्तुनिष्ठ विचार करून मते मांडावी अशी अपेक्षा आहे.   


(प्रशासकांची पुस्ती :


खालील मुद्दे ह्या आणि इतर अनेकानेक संकेतस्थळावर वारंवार चर्चिले जाऊन आता ते येथे अतिचर्चित, अतिचर्वित म्हणून निवृत्त आणि वर्ज्य असे गणले गेलेले आहेत. येथे चर्चा करताना खालील मुद्दे आढळल्यास ते काढून टाकले जाण्याची शक्यता आहे.


ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी ही चर्चा आंतरजाला वरच्या इतर अनेक संकेतस्थळांवर (जेथे चालू असेल तेथे जाऊन) करावी.


१. म. गांधींचे मुस्लिमविषयक धोरण, निर्णय आणि आनुषंगिक मुद्दे.
२. गांधीहत्या आणि आनुषंगिक मुद्दे
३. भारताच्या फाळणीचा इतिहास आणि आनुषंगिक मुद्दे.


इत्यादी. (ह्या यादीत वारंवार बदल होण्याची शक्यता आहे.)


अर्थात एखाद्या लेखनाच्या बाबतीत वरील यादीत वाढ करणे, कपात करणे किंवा तिच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करणे ह्याचा अधिकार प्रशासनाने राखून ठेवलेला आहे. ह्याबाबत कृपया पत्रव्यवहार करू नये.


कळावे.)