कवळी कवेत !

एका आजोबांचं मनोगत ऐकताना मला मनोगतावरील एका कवितेतील
कवळी कवेत या ओळी आठवल्या. सत्तरीतही जीवन समरसून जगणारे हे आजोबा आपल्या काही प्रॉब्लेम्सविषयी, नव्या दूरदर्शनविषयी , नव्या गायकांविषयी काय म्हणतात बघा--


 


हा गोड लाडवांचा सुटला सुवास सारा
कवळी कवेत आहे मी शोधतो बिचारा ॥


दाही दिशा प्रसन्न घर गोड गोड झाले
तोंडास सोडूनिया पण दात हाय गेले ॥


नाकात आपुल्याच घेतो हिमेश तान
माझे नशीब माझे बहिरे आधीच कान ॥

स्वर्गीय दृश्य सारे दूरदर्शनी नजारे
मी मात्र हळहळावे मज मोतीबिंदू का रे ॥

गात्रे शिणून गेली मन हिरवंगार आहे
मी एक सत्तरीचा तगडा जवान आहे ॥


                                                    साती काळे.