नावात काय आहे...

नमस्कार,


काल "सुलभ" बद्दल बातमी वाचली. त्याने म्हणे सगळेजण त्याला चिडवतात म्हणून "सुलभ शौचालय" हे नाव बदलावे म्हणून राष्ट्रपतींना धमकीचे ई-मेल पाठवले. आजकाल कोण कशा प्रकारे "रिऍक्ट" करेल काही सांगता येत नाही.


असो. तर ही जी नावं आपण व्यक्तींना देतो, त्यांची व्युत्पत्ती शोधायचा या चर्चेमागचा उद्देश आहे. व्युत्पत्ती म्हणू या किंवा त्या नावाचा अर्थ म्हणू या.


उदाहरणार्थः- नीलकंठ म्हणजे ज्याचा कंठ निळ्या रंगाचा आहे असा तो, म्हणजे भगवान शंकर. इत्यादी इत्यादी.


तर आपल्याला अशी काही interesting नावांबद्दल माहिती असल्यास इथे द्यावी ही अपेक्षा.


योगेश.
[ नक्की माहिती नाही, पण योगेश हे सुद्धा शंकराचेच एक नाव असल्याचं ऐकून आहे ]