आंतरजालाच्या माध्यमातून मराठी व्याकरणाच्या किमान माहितीच्या उपलब्धतेचा टप्पा पार पडल्या नंतर सर्वंकष मराठी शब्दकोशही महत्त्वाची निकड आहे.
विक्षनरी (दुवा) हा मराठी विकिपीडियाचा सहप्रकल्प आहे. यात प्रत्येक शब्दाचे अर्थ ,समान अर्थी शब्द विरुद्धार्थी शब्द, मराठी व्याकरणा नुसार त्या शब्दाचे कूळ , मूळ शब्द, जाती , सामान्यरूपे, त्यातील प्रत्य्ये,संधी समास,विग्रह,पारिभाषिक संज्ञांच्या व्याख्या, शब्दाचे वाक्यात उपयोग करून दाखवणे, समानार्थी परभाषेतील शब्दांच्या नोंदी, शब्दांचे वर्गीकरण, हे सर्वंकष स्वरूपात अंतर्भूत करणे अपेक्षीत आहे.