पण आम्हाला पार्सलच घ्यायचे होते म्हणून मी निश्चिंत झाले. आम्ही हाक्का नूडल्स आणि राईसचे पार्सल घेऊन हॉटेलवर येऊन खाल्ले.
कधी मी माझ्या सहकाऱ्यांच्या घरीही जात असे. (ते जास्त दिवस राहणार असल्याने कंपनीने त्यांना रहायला एक घर दिले होते. ) कारण तेथे स्वयंपाकघर असल्याने आम्हाला हवे ते बनवून खाता येत असे. थालीपीठ, मूग डाळीची खिचडी, पोहे असे पदार्थ आम्ही बनवून खात असू. त्यातील अभिजीतला व मला चहा आवडत असल्याने तो मला चहा करून देत असे.
पहिल्या आठवड्यात मी एके दिवशी अजेयबरोबर जाऊन यू. के.