वातावरणीय अभिसरण -५
१९ व्या शतकातील प्रगती
विषुववृत्तीय प्रदेशामधील तापलेली हवा उर्ध्वदिशेने जाते व त्यामुळे भूपृष्ठाजवळील हवेचा दाब कमी होऊन उत्तर व दक्षिण दिशांकडून विषुववृत्ताच्या दिशेने हवा वाहते. विषुववृत्तावरची उर्ध्वदिशेला गेलेली हवा ही पृष्ठालगतच्या हवेच्या विरुद्ध दिशेने, म्हणजे धृवाच्या दिशेने प्रवास करते. विषुववृत्तीय प्रदेशातून वर गेलेली तप्त हवा थंड होऊन ध्रुवीय प्रदेशापर्यंत न जाता साधारण ३० अंश अक्षवृत्तावर खाली उतरते. अशा पद्धतीने विषुववृत्त व ३० अंश अक्षवृत्तांदरम्यान हवेचे एक चक्र कार्यरत असते. ह्या चक्राचे नियमन हे औष्णिक स्वरूपाचे असते असा सिद्धांत जॉर्ज हॅडलीने मांडला होता.