प्रिय मनोगती,
उखाण्यांचा एक नवीन प्रकार म्हणून 'खाद्य-उखाणे' ही संकल्पना मांडत आहे. यात नवीन उखाणे सुचवावेत.
अट एवढीच की हे उखाणे खाणे व इतर संबंधित विषयातील ( उदा.स्वयंपाक,स्वयंपाकघर,पाककृती,पदार्थ,चव..इ ) असावे.
खाणे-पिणे हा विषय असल्याने पिण्यात फक्त घरगुती खाद्यपेयांचाच उल्लेख असावा. (उदा. कढी,लस्सी,सार,सरबत,नारळपाणी.. इ) मद्य व मद्यपान हे विषय (पूर्णपणे वर्ज्य! )म्हणून टाळावेत.