स्वर्ग! लहानपणापासून ही कल्पना वेगवेगळ्या प्रकारे समोर आली. मराठी वाङ्मयातून आणि पुढे संस्कृतामधूनही ती पुन्हा पुन्हा भेटत राहिली. मी माझ्या मनात अनेक वेळा स्वर्गाचं चित्र क्लिक करण्याचा प्रयत्न केला; पण ते कधीच मला पूर्ण क्लिक झालंच नाही. मग मी माझ्यापुरती स्वर्गाची व्याख्या केली, की जिथे सारं सौंदर्य आणि सारी सुखं एकवटलेली असतात तो स्वर्ग! पण 'स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ' म्हणतात.
स्वर्गाचं प्रत्यंतर जर मृत्यूनंतरच येणार असेल, तर त्याचा उपयोग तरी काय? कारण कोणत्याही सुखाची चव जर आपल्या माणसांबरोबर चाखता आली नाही, तर त्याला परिपूर्णता येणार कशी? मृत्यूनंतरच्या स्वर्गसुखाची परिपूर्ण अपेक्षा मी करायची, तर तो इतरांवर जरा अन्यायच होईल, नाही का?