प्रशासकमहोदयांच्या सूचनेनुसार नवीन चर्चासूत्रात हे परत लिहीत आहे!
नमस्कार.
'त्या'च्या 'अंतरिम'संदर्भातील प्रतिसादावरून हे आठवले आहे. खरे तर पूर्वी हे अन्यत्र विचारले होते, परंतु तेव्हा त्याचे उत्तर मिळाले नव्हते. या चर्चासूत्रावर मिळेल अशी आशा आहे :
भारताचे स्वातंत्र्य 'लक्ष्मीच्या पावलांनी' आले असे सर्वार्थाने म्हणता येइल. स्वातंत्र्यसंग्रामातील पहिल्या स्वातंत्र्यसमरात राणी लक्ष्मीबाइच्या पाउलखुणा उमटल्या तर अखेरच्या पर्वात आझाद हिंद सेनेच्या झाशी राणी रेजिमेंट मधिल कॅप्टन लक्ष्मीने आपल्या पाउलखुणा उमटविल्या. कोणत्याही लढ्यात स्त्रीच्या सहभगाला अनन्य साधारण महत्त्व आहे. १९२१ साली लेनिन ने महिला दिनाच्या निमित्ताने असे उद्गार काढले होते कि "जोपर्यंत स्त्रीया राजकिय जीवनात सहभागी होत नाहीत तोपर्यंत राजकिय जीवनात जनतेला ओढले असे म्हणता येणार नाही". सात वर्षांनंतर म्हणजे १९२८ साली नेताजी सुभाष यांनी काँग्रेस सम्मेलनात असे प्रतिपादन केले कि " स्त्रीयांच्या सक्रिय सहानुभुतीशीवाय आणि पाठिंब्याशिवाय राष्ट्रातील पुरुषांना स्वातंत्र्य मिळणार नाही". खरोखरच इतिहासाला ज्ञात आणि अज्ञात असलेल्या असंख्य स्त्रीयांनी भारतिय स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व समर्पित केले आहे. काही इतिहासकारांनी अशी खंत प्रांजलपणे व्यक्त केली आहे कि स्त्रियांचा सहभाग तितकासा प्रकाशात आला नाही वा गौरवला गेला नाही.
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.