खरेतर 'जर' आणि 'तर' याला काही अर्थ नसतो. पण तरीही हे जर-तर विलक्षण हुरहुर लावून जातात. कारण जर तसे घडते तर जगाचा इतिहास बदललेला दिसला असता, अनेक संदर्भ बदलले असते.
डंकर्क ला कैचीत सापडलेल्या तीन लाख पस्तीस हजार दोस्त सैन्याला फ़्यूरर ने जर जाउ दिले नसते तर आज जगाचा नकाशा फ़ार वेगळा दिसला असता. बेफ़ाम पॅझर्स का थांबले आणि लुफ़्त्वाफ़ेने झडप का घातली नाही हे प्रश्न अनुत्तरीत आहेत. कुणी या मागे गुडेरिन आणि गोअरिंगच्या श्रेष्टत्वाची चुरस हेही कारण सांगतात. पण जर नाझी सैन्य त्या वेळी डंकर्क वर एकवटले असते तर... तेव्हा नेमके हेच दिवस होते. ३० मे ते चार जून. आज त्याला साठ वर्षे झाली.