संवादाची भूक

कोणत्याही व्यक्तीला असते संवादाची भूक, अगदी जख्खड म्हाताऱ्याला पण वाटतं कुणीतरी आपल्याशी दोन शब्द बोलावेत, अजून धड चालता येत नसलेल्या बाळाला देखिल गरज वाटते रडून आपली भावना व्यक्त करण्याची, इतकंच काय पण ज्यांना बोलता येत नाही असे लोक देखिल हातवाऱ्यांच्या साहाय्याने करतातच की ही भूक पूर्ण...
कास्ट अवे मध्ये नाही का टॉम हँक्स सोबत म्हणून त्याच्या व्हालीबॉलला विल्सन करत...
अगदी आदिम काळापासूनची गरज आहे ही आपली, म्हणून तर भाषेचा शोध लागला...