आणि मी यू. के. ला जाऊन आले...२

   विमानाने उड्डाण केल्यावर काही वेळाने जेवण व पेय दिले गेले. ते झाले पण मला अजिबात झोप येईना. मी खूप टेंशनमध्ये होते. कंपनीने कितीही चांगली सोय केलेली असली तरी मला एकदा त्या यू. के. मधील माझ्या हॉटेलवर पोचल्याशिवाय स्वस्थता मिळणार नव्हती. नाना शंका कुशंका माझ्या मनात सारख्या येत होत्या. आणि त्यांना दूर लोटून मी पुन्हा पुन्हा झोपण्याचा असफल प्रयत्न करत होते. माझ्या शेजारच्या आजीबाई मात्र जेवण करून मस्त ढाराढूर झोपल्या होत्या. त्या ह्या सर्व गोष्टींना चांगल्याच सरावलेल्या दिसत होत्या.

आठवणी शाळेतल्या !

       शाळेत जाण्याचा मला लहानपणापासून तिटकारा.अर्थात आमच्या काळी ही सार्वत्रिक गोष्ट होती.म्हणजे हौसेने शाळेत जाणारा मुलगा क्वचितच दिसे.बहुतेक पहिले काही दिवस मारपीट करूनच पोराला शाळेत पाठवावे लागे.शिवाय त्याचे पालक शाळेत येऊन परत "त्या पोराला चांगला बडवा, मुळीच गय करू नका त्याची" असे बजावत असल्याने शाळा म्हणजे मार खाण्याची जागा ही  त्या मुलाची समजूत आणखीनच दृढ व्हायची.त्यामानाने मुली मात्र हौसेने शाळेत जात.त्याचे एक कारण असे असू शकेल की बिचाऱ्या मुलींच्यावर घरातील कामाचा बोजा पडत असल्याने शाळेत जाऊन आराम करणे त्याना अधिक पसंत पडत असणार.त्यामुळे माझ्या दोन्ह

आणि मी यू. के. ला जाऊन आले...१

   मला माझ्या कंपनीने प्रशिक्षणासाठी यू. के. ला पाठविण्याचे ठरविले. 'तू जाशील का? ' असे माझ्या टीम लीडने मला विचारले तेव्हा मी लगेच हो म्हणाले. कारण माझी खूप दिवसांपासूनची परदेशी जाण्याची इच्छा होती. आणि प्रशिक्षण फक्त २ आठवड्यांचेच होते.

अभिनंदन.

आज १.८.२०१३ म. टा. मध्ये वाचलेली बातमी...

दुवा क्र. १

वाई तालुक्यात भुईंजमधली शिकण्याची व जगण्याची लढाई पुढे सूक्ष्मजीवशास्त्रातील संशोधनाच्या संधीसाठी झगडण्यात परावर्तित होईल , असे मेघाला वाटले नव्हते. स्पेनमध्ये पीएचडी केल्यानंतर मेघा लोखंडे हेपटायटिसमधील संशोधन पुढे नेत स्वित्झर्लंडच्या बर्न्स विद्यापीठात रुजू होण्यासाठी सज्ज झाल्या आहेत...