मी असेन तेव्हा ७-८ वर्षांचा आई बरोबर शाळेतून घरी येत होतो. फार मोठा पाऊस नसला तरी अंग भिजण्याएवढा नक्की होता. एका हाताने छत्री आणि दुसऱ्या हाताने मला पकडून ठेवताना तिची होणारी धांदल सहज दिसत होती. पण मला मात्र पावसात खेळायचं होतं, माझी तीच मस्ती सुरू असताना मी एक छानपैकी दंडवत घातला रस्त्यात, रस्त्यामधला बराचसा चिखल आता माझ्या अंगावर आणि कपड्यांवर आला होता आणि माझं ते ध्यान बघून टपोऱ्या डोळ्यांची, दोन वेण्या घातलेली एक मुलगी हसत होती. भरीस भर म्हणून आईच्या हातचे २ रट्टे पण बसले पाठीत.