‘एकोऽहं बहुस्यामह:’... केवळ आनंदस्वरूप, नित्य, निराकार, अनादी, अनंत असणारा परमेश्वर. त्याला ‘आपण बहु व्हावे, असे का वाटावे?... आनंदसागरातल्या त्याच्या एकटेपणाचा त्याला वीट आला होता ?... का त्या आनंदसागरात त्याला अनेकांची साथ हवी होती ?... का त्याचं ते स्वप्नरंजन होतं ?... तसं नसणारंच्, कारण तो त्या आनंदसागरात महायोगनिद्राधिन होता. त्या अवस्थेत स्वप्नाची शक्यता राहत नाही... काहीही असो, या सर्वसत्ताधिशाला अनेक होण्याची इच्छा होणे, याचाच अर्थ त्याचे महायोगनिद्रेतून बाहेर येणे. ही घटना त्या परमेश्वराला आनंदपरिपूरित अवस्थेतून बाहेर आणणारी ठरते का ? तर तसेही नाही...