घिसाडकामाचे दिवस

          पुणे आणि अमेरिका या दोन्ही  स्थानात एक मोठे साम्य आहे.ते म्हणजे तेथे जाण्यापूर्वी जाणारे लोक या स्थानांना शिव्या देत असतात पण तिकडे जाण्यासाठी मात्र त्यांचा जीव कासावीस झालेला असतो. त्यामुळे अमेरिकेत जसे मूळ अमेरिकनांचाच पत्ता नाही तसाच पुण्यातही.   अस्सल पुणेकर आता एकमेव पुण्य़भूषण सुधीर गाडगीळ यांच्याव्यतिरिक्त कोणी राहिले असेल असे वाटत नाही.तरीही पुणेरी संस्थांचा अभिमान अस्सल पुणेकरांइतकाच आता बाहेरून येऊन स्थायिक झालेल्या  या पुणेकरांनाही तितकाच असतो.

ते नयन बोलले काहितरी ...

अमेरिकेत मराठी मंडळाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना नेत्रा कधी जात नसे. पण ह्यावेळी मंडळाने खास स्पर्धेचा कार्यक्रम ठेवला होता, आणि कुणा ओळखीच्यांच्या मुलीचे भावगीत गायन त्यात व्हायचे होते. त्यांनी सप्रेम आग्रह केला होता त्यामुळे नेत्रा कार्यक्रमाला आली होती. अर्थात तीच तीच गाणी ऐकून ती कंटाळली आणि बाहेर ओसरीवर कॉफी प्यायला म्हणून आली तो काय समोर नयना!!!

आचार्य विनोबा - विचार पोथीच्या निमित्ताने ...

आचार्य विनोबा - विचार पोथीच्या निमित्ताने ....

आचार्य विनोबांच्या साहित्याची ओळख झाली साधारणतः १९८१ च्या सुमारास.    त्याआधी आम्ही सगळे मित्र त्यांची टवाळकीच करायचो. पण एका मित्राला "गीता प्रवचने"
पुस्तक मिळाले आणि त्याने पहिले स्फुल्लिंग पेटवले - अरे, कस्लं भारी पुस्तके
हे....

झालं - त्या एका पुस्तकानेच जी मोहिनी पडली विनोबा वाङ्मयाची ती
कायमचीच..
मग हळुहळु स्थितप्रज्ञ दर्शन, गीताई चिंतनिका, प्रेरक पत्रांश, विचार
पोथी, मधुकर, अष्टादशी या सगळ्या ग्रंथसंपदेनं काबीजच केलं अंतःकरण.