राम रामेति रामेति...

परवाच गुढीपाडवा दणक्यात साजरा झाला. या वर्षी पाडव्यानिमित्त सुट्टी मिळाल्यामुळे असेल कदाचित पण यंदा पाडव्याला सगळ्यांचाच उत्साह ओसंडून वाहत होता. खूपच छान वाटलं. फाल्गुन संपला आणि चैत्र सुरू झाला. मला चैत्र फार आवडतो. चैत्रामध्ये मला सगळ्यात काय आवडत असेल त्या महिन्यात भरगच्च असलेले खास दिवस. आणि, आपल्यासारखाच देवांनाही उन्हाळ्याचा त्रास होऊ नये म्हणून देवासमोर भरून ठेवायचं चांदीचं इटुकलं तांब्या-भांडं. देवावर मनुष्यत्वाचा आरोप ( म्हणजे आळ नव्हे! हा अलंकारिक आरोप आहे याची कृपया नोंद घ्यावी!! ) केल्यावर तो माणसांच्या जास्त जवळ येत असावा.

मन शुद्ध तुझं (२)

ज्या गोष्टी करू नयेत, हे माहित असूनही 'इलाजच नाही' असे म्हण्त, प्रवाहपतिताप्रमाणे, त्या गोष्टी करू नका. ज्या गोष्टी करायला पाहिजेत, त्या गोष्टी जाणूनबुजून, निक्षून करायला सुरुवात करा. याच पद्धतीने सन्मार्गावर राहाल. जो सन्मार्गावर असतो, त्याच्यावर परमेश्वरी क्रुपेचा वर्षाव सुरू होतो.

यशस्वी कवी

कवीचे यशस्वी होणे अनेक गोष्टींवर अवलंबून असते. कविता चांगल्या असणे , हृदयाला भिडणाऱ्या असणे हा एक भाग झाला. इतरही अनेक गोष्टींनी कवी प्रसिद्ध होताना दिसतात.
समजा, एखाद्या कवीच्या १०० पैकी १० रचना चांगल्या आहेत. त्या वारंवार लोकांसमोर आल्या तर साहजिकच तो कवी चांगला गणला जातो. मात्र, दुसऱ्या कवीच्या १०० पैकी ५० रचना चांगल्या आहेत पण काही कारणाने त्या लोकांसमोर नाही आल्या तर तो कवी तितका यशस्वी ठरत नाही.
........
काही कवी सर्वात यशस्वी विषय घेऊन कविता करताना दिसतात. सांप्रदायिक भाव जपून कविता करणारेही त्या त्या समाजात यशस्वी होताना दिसतात.