सॅन्डविच

सॅन्डविच
"काका, पुण्याहून येताना कॅम्पातून चीझ घेऊन येशील ना ? नक्की न विसरता... " अशी आठवण श्रेयाने आपल्या काकाला फोन करून, एसएमएस आणि ईमेल जे जे शक्य होईल त्याने  दिवसातून किमान चोवीस वेळा करून दिली होती.

स्मृतिगंध-११ "गोकुळ"

घराच्या कर्जाचे हप्ते वेळेवर जात नव्हते म्हणून मार्च ६९ मध्ये मी बँकेचा राजीनामा दिला आणि फंड व ग्रॅच्युइटीच्या पैशातून कर्ज फेडले. मुलांच्या शाळा सुरू झाल्या होत्या. खर्च वाढला होता. संसाराचा गाडा चालवायचा तर आता माझ्याकडे नोकरी नव्हती पण हिची नोकरी असल्यामुळे ते दिवस तगले. फंडाच्या उरलेल्या पैशातून एक गाळा भाड्याने घेऊन किराणा-स्टेशनरीचे दुकान सुरू केले. साधारण ७०-८० रु विक्री रोज होत असे. पुढे दुकान चांगले चालू लागले पण खरेदीकरता पैशाची चणचण भासू लागली. सकाळी ७ला दुकान उघडत असे. दुपारी जेवून माल खरेदीसाठी मुंबईस जात असे.