मनुष्य अनुभवाच्या साठ्यातून वेचून लिहितो म्हणतात. 'म. ला. व्यं. ' (महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व अर्थात पुलं ) च्या लिहिण्यावर इतकं लिहिलं गेलंय की आणखी लिहिणं म्हणजे पांढऱ्यावर (आणखी) काळं करणं..
पण तरीही पुलंचे वाङ्मय वाचलेल्या वाचकास त्यांच्या लिहिण्यात अटळ पुनरावृत्ती आढळते. तसे पुलं म्हणजे 'उत्कट, भव्य त्या सगळ्यासमोर झुकणारे' - गुण गाईन आवडी, व्यक्ती आणि वल्ली, गणगोत या सगळ्या पुस्तकांतून हा गुण दिसून येतो.
हे सारं साहित्य पुन्हा पुन्हा वाचताना त्यांचे एकमेकांत गुंतलेले धागे मिळाले, त्यांची गाथा -