मे १९९० मध्ये आमच्या एका ए. डी. ने, भाटिया त्यांचे नांव, सकाळी आंग्ल भाषेतील एक पत्रक माझ्या हाती सोपविले आणि ते स्वतः एम. बी. ए. च्या टिपण्या काढण्यात न बोलता घुसले. त्या पत्रकावरून धावती नजर फिरविली. तो विषय बहुधा त्या वेळेस त्यांना नको असावा. मी माझ्या जागेवर येऊन बसलो. पत्रकाचा विषय सर्वांसाठीच महत्त्वाचा वाटला. त्याचे यथाशक्ति मराठीत भाषांतर केले. मनाला शांती लाभवून देणारी ही गुरुकिल्ली सर्वांना मार्गदर्शक होईल असे वाटते. आपण क्रमशः पाहू...